नांदेड: आदिलाबाद– मुंबई सी.एस.टी.एम. नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस आणि नागपूर- कोल्हापूर विशेष एक्स्प्रेस पुन्हा सुरु होणार
कमी प्रवासी संखेमुळे आदिलाबाद– मुंबई सी.एस.टी.एम. नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस आणि नागपूर- कोल्हापूर विशेष एक्स्प्रेस तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या होत्या, या दोन्ही गाड्या पुन्हा सुरु करण्यात येत आहेत.
1. गाडी संख्या ०११४१ मुंबई सी.एस.टी.एम. ते आदिलाबाद नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस मुंबई सी.एस.एम.टी. येथून १ जुले २०२१ पासून धावणार आहे.
2. गाडी संख्या ०११४२ आदिलाबाद ते मुंबई सी.एस.टी.एम. नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस येथून २ जुले पासून धावणार आहे.
3. गाड़ी संख्या ०१४०४ कोल्हापूर ते नागपूर विशेष एक्स्प्रेस २ जुले पासून कोल्हापूर ते नागपूर अशी धावणार आहे.
4. गाड़ी संख्या ०१४०३ नागपूर ते कोल्हापूर विशेष एक्स्प्रेस३ जुले पासून नागपूर ते कोल्हापूर अशी धावणार आहे.
गाडीच्या वेळा आणि थांबे पूर्वी प्रमाणेच असतील. यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. या गाड्या पूर्णतः आरक्षित असतील. गाडीमध्ये प्रवास करतांना केद्र शासनाने आणि राज्य शासनाने दिलेले कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे प्रवाशांना बंधनकारक असेल.