पुणे: जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांच्यावतीने महसूल दिनाच्या निमित्ताने रविवार, 1 ऑगस्ट रोजी महसूल विभागाच्या नवीन ऑनलाईन सुविधांचा दूरदृष्यप्रणालीद्वारे शुभारंभ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सायंकाळी 4 वाजता उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला मंत्रालयातील संबधित विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत. यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थितीत राहणार आहेत. कार्यक्रमात डिजीटल स्वाक्षरीत फेरफार वितरण, सुधारित नमुन्यातील सातबारा वितरण, ई-मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार प्रणाली दस्त नोंदणी प्रक्रियेशी संलग्न करणे यांचा समावेश असणार असल्याची माहिती राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक एन. के. सुधांशु यांनी दिली आहे.