मुंबईः राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याच्या निर्णय आज बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली.
राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच मॉल्समध्ये प्रवेश असेल. राज्यातील धार्मिक स्थळे तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत झालेले अन्य निर्णय:
नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-१ आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) ही पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्याचा निर्णय.
अमरावती जिल्ह्यातील राजुरा लघुपाटबंधारे प्रकल्पास १९३.८१ कोटींची सुधारित मान्यता.
राज्यातील अनाथांना एक टक्का आरक्षण लागू करण्याचा निर्णय.
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारित योजना राज्यातही राबवण्याचा निर्णय.
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा करण्याचाहीन निर्णय.