# बालाजी सुतार, अखिला गौस, अलका तडकलकर यांना अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे पुरस्कार जाहीर.

अंबाजोगाई: कथालेखक बालाजी सुतार, प्राचार्या डॉ. अखिला गौस आणि लेखिका अलका तडकलकर यांना 9 व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनात पुरस्कार जाहीर जाहीर झाले आहेत. दिवंगत संमेलनाध्यक्षांच्या नावे दिल्या जाणाऱ्या तीन साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

1) डॉ. संतोष मुळावकर शिक्षक साहित्यिक पुरस्कार – डॉ. अखिला गौस
2) डॉ. शैला लोहिया लेखिका पुरस्कार- प्रा. अलका तडकलकर
3) मंदाताई देशमुख कथा लेखक पुरस्कार- बालाजी सुतार

16 व 17 ऑक्टोबर 21 रोजी ९वे अंबाजोगाई साहित्य संमेलन प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

मराठवाडा साहित्य संमेलनाचे सचिव अमृत महाजन यांनी सांगितले की, हे पुरस्कार सन्मानाचे आहेत. डॉ. अखिल गौस ह्या महिला महाविद्यालयात प्राचार्या असून उर्दू साहित्यात त्यांचे भरीव योगदान आहे. म्हणून त्यांना प्राचार्य डॉ. संतोष मुळावकर यांच्या नावाचा शिक्षक साहित्यिक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
बालाजी सुतार हे ख्यातनाम साहित्यिक असून त्यांच्या कथांवर बेतलेल्या ‘गावकथा’ कार्यक्रमाने अंबाजोगाईची मान उंच केली आहे. म्हणून त्यांना मंदाताई देशमुख यांच्या नावाचा कथालेखक पुरस्कार देण्यात येत आहे. डॉ. अलका तडकलकर यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यांना डॉ. शैला लोहिया यांच्या नावांनी दिला जाणारा लेखिका पुरस्कार देण्यात येत आहे.

  1. संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, प्रमुख पाहुणे भगवानराव शिंदे व स्वागताध्यक्षा कमलताई बरुळे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण संमेलनाच्या समारोप सत्रात केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *