# पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने तयार केलेला व्हेंटिलेटर राज्यातील 5 रुग्णालयांमध्ये वापरणार.

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई: पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी व्हेंटिलेटर तयार केले असून, ते लवकरच पाच रुग्णालयांमध्ये वापरले जाणार आहे. एसएनडीटी विद्यापीठामध्ये ‘जीवनरक्षक’ कोर्सची निर्मिती करण्यात येत असून हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेला मदत करू शकतील. हा अभ्यासक्रम आपत्ती व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थ्यांना देईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.

श्री.सामंत यांनी आज शुक्रवारी सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाने आपत्कालीन निधीतील काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हीड-19 साठी देवून सहकार्य करावे असे, आवाहन श्री. सामंत यांनी केले.

या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ. अभय वाघ, विद्यापीठीय परीक्षेसंदर्भात गठीत समितीचे सर्व सदस्य तसेच सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *