औरंगाबाद: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सध्या सर्वत्र सार्वजनिक जयंती उत्सव सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास शासनाने बंदी घातलेली आहे. यावर लिंगायत सामाजाने उपाय काढत शासनाचे सर्व नियम पाळून सोशल मीडियावर सर्व बसवजयंती मंडळामार्फत रविवार, 26 एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वरांची जयंती ऑनलाइन पध्दतीने राज्यस्तरावर साजरी होणार आहे.
यानिमित्ताने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील नामवंत 50 व्याख्यात्यांचा सहभाग राहणार असून, ही व्याख्यानमाला 24 एप्रिल ते 3 मे पर्यंत फेसबुक पेज व युट्युबवर पाहता येईल. या जागतिक महामारिच्या पार्श्वभूमीवर बसवजयंती घराघरात राष्ट्राचे हीत जपत साजरी केली जाणार आहे. तसेच बसवजयंती बसवण्णांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातावर प्रकाश टाकणारी-कोरोनासारख्या रोगावर मात करणारी असावी. या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील नामवंत वक्ते विचारवंत अभ्यासक यांच्या सहाकार्यातून आणि बसवजयंती उत्सव मंडळाच्या सहयोगाने बसवविचारंचे वैचारिक अभिसरण घडणार आहे. सोशल मीडियातून भव्यदिव्य महाराष्ट्र राजयस्तरिय बसवजयंती महोत्सवानिमित्त विविध विषयांवर व्याख्यान सत्राचे आयोजन केले जाणार आहे. घरबसल्या वक्ते आणि मंडळाचे कार्यकर्ते व्हीडीओ रेकाॅर्डिंगच्या माध्यमातून सवांद साधतील.
फेसबुकवरील लिंगायत या पेजवर हे व्हीडीओ प्रसारित केले जातील. विशेष म्हणजे जे कधीही कुठेही पाहता वा ऐकता येतील. सहभागी झाल्याबद्दल संबंधित मंडळे आणि वक्ते यांना सन्मानित करण्यात येईल. जयंती उत्सव आणि बसवजयंती मिरवणुकीसाठी जमा केलेल्या अतिरिक्त निधीतून कोरोनाग्रस्त आणि गरिब लोकांना मदत करावी, असे आवाहन लिंगायत धर्म महासभा (महाराष्ट्र राज्य) तालुका अध्यक्षा शोभाताई जिनगी यांनी केले आहे. घरी सुरक्षित राहून प्रशासन, पोलीस, वैद्यकीय व्यवस्था यांना सहकार्य होईल. याप्रमाणे जयंती साजरी करावी, असे आवाहन राज्यस्तरीय बसवजयंती उत्सव समितीच्या वतीने गणेश वैद्य, राजेंद्र वाजुंळे, अभिषेक देशमाने, मोहन मिटकरी, सिद्राम कवळीकट्टी अभिजीत घेवारे यांनी केले आहे. व्याख्यान माला पाहण्यासाठी लिंगायत – Lingayat ह्या फेसबुक पेज व युट्यूब चॅनलला जाॅईन व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.