पुणे: पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या हद्दीत तीन आसनी ऑटोरिक्षांच्या भाडेदरामध्ये वाढ करण्याचा घेण्यात आलेला निर्णय पुढील बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आलेला असून ऑटोरिक्शांसाठी सध्याचे दर कायम राहतील.
पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या संयुक्त बैठकीत येत्या 8 नोव्हेंबरपासून पहिल्या दीड कि.मी.साठी 20 रुपये तर त्यापुढील प्रत्येक कि.मी.साठी 13 रुपये भाडेदर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खटुआ समितीच्या शिफारशींनुसार प्राधिकरणाने हा निर्णय घेतला होता. तथापि देण्यात आलेल्या भाडेवाढीचा पुर्नविचार करण्याबाबत रिक्शा संघटनांनी निवेदने सादर केली असल्याने भाडे दरवाढीची बाब प्राधिरणाच्या पुढील बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत सध्या असलेले पहिल्या दीड कि.मी.साठी 18 रुपये तर पुढील प्रत्येक कि.मी.साठी 12.19 रुपये असे दर कायम राहतील असे प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी कळवले आहे.