# राजकिशोर मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम.

अंबाजोगाई: अंबाजोगाई नगर परिषदेचे प्रभारी  नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजकिशोर (पापा) मोदी यांच्या १९ नोव्हेंबर रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित राजकिशोर मोदी मित्रमंडळाच्या वतीने अनेक समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . वाढदिवसानिमित १८, १९ आणी २१ नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे .

दिनांक १८ नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी चार वाजता अंगणवाडी ताई आणि सेविका तसेच आशा वर्कर्स, तथा अंबाजोगाई शहरात व शहरालगत पाल (तंबू) ठोकून राहणाऱ्या गरीब महिलांना साडी आणि ब्लॅंकेटचे वाटप आणि त्यांच्या अल्पोपहाराचे आयोजन देखील करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी सहा वाजता संत भगवानबाबा चौक येथे I LOVE AMBAJOGAI  या नावाची लाईट फ्रेम बसवण्यात येणार आहे .

राजकिशोर मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १९ नोव्हेंबर शुक्रवारी सकाळी ९ वाजता श्री योगेश्वरी देवीची महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ०९:३० वाजता चनई येथील किरमानी दर्ग्यात फुलांची चादर चढविण्यात येणार आहे. सकाळी ०९:४५ वाजता संघर्षभूमी चनई येथे येथील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून वंदना घेण्यात येणार आहे. तसेच सकाळी १०  वाजता  मुकुंदराज शाळेसमोरील डॉ.बुरांडे यांच्या रुग्णालयात मोफत फिजिओथेरपी शिबीर घेण्यात येणार आहे. यानंतर लगेचच १०:३० वाजता रविवार पेठ परिसरातील गवळी समाजाच्या  स्मशानभूमीत सिमेंट काँक्रीटचे बेंच बसवून तेथे वृक्षारोपण राजकिशोर मोदी मित्रमंडळी कडून करण्यात येणार आहे .

राजकिशोर मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या आरोग्याकडेही लक्ष केंद्रित केले आहे. यात महिलांसाठी मोफत रक्ततपासणी करून रक्तातील हिमोग्लोबिन चे निदान करून त्यावर  उपचार  करण्यात येणार आहेत . या कार्यक्रमानंतर कोरोना महामारीत मृत्यूमुखी पडलेल्याच्या विधवा, गरीब आणि निराधार महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे .

वाढदिवसादिवशी दुपारी १२ वाजता परळी रोड पिंपळा येथील जीवनआधार वृद्धाश्रम  येथील  वृद्धांना एक  महिन्याचे अन्नधान्य (किराणा)  सामान देण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना १००० वह्या आणि १००० पेनचे वाटप करण्यात येणार आहे . सायंकाळी ६ वाजता कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. तसेच संध्याकाळी ०७:३०वाजता स्थानिक कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संगीत रजनी, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

राजकिशोर मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून  दिनांक २१, शनिवार रोजी डॉ. राजेश इंगोले यांच्या समाधान रुग्णालयात मोफत मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन सकाळी ११ ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केले आहे. तसेच प्रभाग क्रमांक ३ मध्ये नवीन मतदारांची  मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यात येणार असल्याचे राजकिशोर मोदी मित्रमंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *