औरंगाबाद: मराठा आरक्षण अंदोलनात ज्या व्यक्तींना आपले जीव गमवावे लागले अशांच्या कुंटुबातील वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येक जिल्ह्यात दहा लाख रुपयाचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वाटपासाठी वर्ग करण्यात आला होता. आज औरंगाबाद जिल्ह्यास प्राप्त झालेल्या निधींच्या धनादेशाचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयात पाच कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, आमदार अंबादास दानवे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, विनोद पाटील यांच्यासह मराठा आरक्षण अंदोलनातील मृतांचे कुटुंबीय यांची उपस्थिती होती. कौशल्या कारभारी शेळके, विजय चौक, गारखेडा परिसर, लंका केशव चौधरी, न्यू हनुमान नगर, गारखेडा, औरंगाबाद, रुक्मणीबाई जगन्नाथ सोनवणे, देवगाव रंगारी, ता. कन्नड, संगीता उमेश एंडाईत, चौधरी कॉलनी, चिकलठाणा, औरंगाबाद, शिवाजी किशोर हार्दे, रा. गल्लेबोरगाव, ता. खुलताबाद यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.