‘रिसर्च अँड रिव्यू रायटिंग’ कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्या प्रतिष्ठान, सेफराईट संस्थेचा सहभाग
पुणे: विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभाग व इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबियल सायन्स, पुणे आणि सेफराईट, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने “रिसर्च अँड रिव्यू रायटिंग” या विषयावर एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांचाही भरभरून प्रतिसाद मिळाला अशी माहिती डॉ. भरत शिंदे यांनी दिली.
कार्यशाळेचे उद्घाटन जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर राजेश शर्मा यांनी केले. अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांसाठीही का गरजेचे आहे हे त्यांनी उद्घाटना दरम्यान सांगीतले. या कार्यशाळेदरम्यान दोनशेहून अधिक मुले गुगल मीट व प्रत्यक्ष महाविद्यालयाच्या सभागृहातून सहभागी झाले.
कार्यशाळेत प्रथम राजेश ढाकणे, यांनी रिसर्च आणि रिव्यू रायटिंग यावर विस्तृत सैद्धांतिक भाष्य केले. कोरोना च्या काळातही संशोधन करता न आल्यास लिटरेचर रिव्यू करून एक रिव्यू आर्टिकल प्रकाशित करता येऊ शकते याबद्दल माहिती दिली.
कार्यशाळेचे दुसरे सत्र जागतिक क्रमांकातील 48 व्या विद्यापीठातील (द युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलैंड) पीएचडी झालेले डॉ. अभिजीत रावसाहेब सुरवसे यांनी पार पाडले. त्यांची ‘सेफराईट’ नावाची संस्था असून यात ते नियमितपणे मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे लिखाण करण्याचे प्रशिक्षण देतात. सेफराईट च्या प्रशिक्षणाद्वारे कमी वेळेत उत्कृष्ट दर्जाचे लिखाण मुले व शिक्षक कसे करू शकतील याचे प्रात्यक्षिक या कार्यशाळेत दाखवण्यात आले. डॉ. अभिजीत सुरवसे यांचा भारतातील सर्व तरुण संशोधकांना लिखाणाबद्दल प्रशिक्षण माफक दरात देण्याचा मानस आहे व ते विद्या प्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यासारख्या संस्थांसोबत प्रशिक्षणाचे करार करण्याच्या उद्दिष्टाने वाटचाल करत आहेत.
या संपूर्ण कार्यशाळेचे प्रमुख उद्दिष्ट तरुणांमध्ये संशोधनाचे लेखन व त्याचे प्रकाशन जागृती आणण्याचे होते. ही कार्यशाळा उपयुक्त ठरल्याचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी सांगीतले प्राचार्य डॉ. शिंदे उपप्राचार्य शामराव घाडगे, नीलिमा पेंढारकर यांचे कार्यशाळा यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल डॉ. राजेश ढाकणे व डॉ. अभिजीत सुरवसे यांनी अभिनंदन केले. प्रास्ताविक, परिचय आणि सूत्रसंचालन डॉ. राजेश शर्मा यांनी केले.
आंतरराष्ट्रीय श्रेणीचे प्रकाशन व त्याबद्दल प्रशिक्षण ही उच्च शिक्षणासाठी प्रमुख घटके आहेत असा मानस प्राचार्य डॉ. भारत शिंदे यांनी व्यक्त केला. त्या अन्वये डॉ. भरत शिंदे व डॉ. राजेश शर्मा यांनी विद्या प्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात अशा प्रकारची कार्यशाळा घेऊन मुलांसाठी उपयुक्त व परिपूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे.