लाईन ब्लॉकमुळे औरंगाबाद- हैदराबाद एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

नांदेड: लाईन ब्लॉकमुळे औरंगाबाद- हैदराबाद एक्स्प्रेस काही दिवस औरंगाबाद येथून 125  मिनिटे उशिरा सुटणार, तर काचीगुडा- रोटेगाव विशेष गाडी 40 मिनिटे उशिरा धावणार आहे.

करमाड ते चिखलठाणा सेक्शन मधील रेल्वे पटरी चे नवीनीकरण (थ्रू स्लीपर रेण्युवल) करण्या करिता दिनांक 18 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2022 दम्यान आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी 180 मिनिटांचा लाईन ब्लॉक  घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दुपारी 03.05 पासून सायंकाळी 06.05 वाजे पर्यंत घेण्यात येणार आहे. वरील कालावधीत एकूण 17 ब्लॉक घेवून हे कार्य पूर्ण करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे कार्य महत्वपूर्ण आहे. 

हा लाईन ब्लॉक दिनांक 19, 22, 24, 26, 29, 31 जानेवारी आणि दिनांक 02, 05, 07, 09, 12, 14, 16, 19, 21, 23, 26 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 17 दिवस घेण्यात येणार आहे. यामुळे औरंगाबाद ते हैदराबाद एक्स्प्रेस आणि काचीगुडा ते रोटेगाव विशेष गाडी या दोन गाड्या वरील तारखेस उशिरा धावतील , ते पुढील प्रमाणे:

१.लाईन ब्लॉक च्या दिवशी गाडी संख्या 17650 औरंगाबाद ते हैदराबाद एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून तिची नियमित वेळ दुपारी 04.15 वाजता ऐवजी 125 मिनिटे उशिरा म्हणजेच सायंकाळी 06.20  वाजता सुटेल.
२.लाईन ब्लॉक च्या दिवशी गाडी संख्या 17661 काचीगुडा– रोटेगाव विशेष गाडी जालना ते करमाड दरम्यान 40 मिनिटे उशिरा धावेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *