# पत्रास कारण की: महामहीम राज्यपाल महोदय यांसी…

कंगना रानावत ह्या अभिनेत्री बद्दल राज्यपाल महोदयांनी दाखवलेली सहहृदयता व आस्था बघून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक व चित्रपट निर्माते नीलेश नवलाखा यांनी राज्यपाल महोदय भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेलं पत्र येथे देत आहोत…

दिनांक: १३-०९-२०२०

प्रति,
सन्मानीय श्री. भगतसिंह जी कोश्यारी
महामहीम राज्यपाल
राजभवन, मुंबई
महाराष्ट्र.

संदर्भ: कंगना रानावत ह्या अभिनेत्री बद्दल आपण दाखवलेली सहहृदयता व आस्था.

विषय: पुणे महानगर पालिकेतील माझ्या कायदेशीर कामासाठी आपल्याकडून सहकार्य व आशीर्वाद मिळणेबाबत.

माननीय महोदय,

आजच मी काही वृतवाहिन्या वर बातमी बघितली, मला आपल्या सहहृदयता व चित्रपटसृष्टी बद्दल असलेली आस्था बघून अतिशय आनंद झाला. आपण कंगना रानावात ह्यांच्या ऑफिसचे बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने केलेल्या अतिक्रमण कारवाईत आपण वैयक्तिक लक्ष घालून अभिनेत्री कंगना रानावत ह्यांना बोलवून घेऊन भेट दिली व महाराष्ट्राच्या महत्वाच्या अधिकार्‍यांनाही आपण बोलवून ह्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.

मी मराठी चित्रपट निर्माता आहे व पुण्यात छोटासा बांधकाम व्यावसायिक आहे. माझा हडपसर येथे एक छोटासा प्रकल्प चालू आहे, मी लाखो रुपये महानगरपालिकेला डेवलपमेंट कराच्या अनुषंगाने भरत आहे, माझ्या प्रकल्पाच्या समोर बेकायदेशीर बांधकाम गेल्या ४-५ वर्षात झालेली आहेत. परंतु गेल्या ४-५ वर्षात अनेकदा तक्रारी करूनही महानगर पालिकेने त्याच्यावर काहीही कारवाई आजपर्यंत केलेली नाही. मी महाराष्ट्राचा नागरिक असून माझ्या कायदेशीर बांधकामाला संरक्षण देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु त्यांनी माझ्यावर सतत अन्याय केला आहे. मी लाखो रुपये महानगरपालिकेला कर स्वरुपात देऊनसुद्धा माझ्या आजूबाजूला बेकायदेशीर बांधकाम झाल्यामुळे माझे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कंगना रानावत ह्यांचे बांधकाम बेकायदेशीर होते परंतु माझे बांधकाम कायदेशीर आहे. माझ्यासारख्या कायदेशीर मार्गाने व्यवसाय करणार्‍याला आज कोणीही मदत करत नाही. आपण मुंबई महापालिकेच्या कारभाराकडे लक्ष देत आहात त्यामुळे मला खात्री आहे की आपण पुणे महापालिकेच्या सुद्धा कारभारात लक्ष घालाल व मराठी चित्रपट निर्मात्याकडे सुद्धा त्याच आस्थेने पहाल.

आज कोरोनाचे एवढे मोठे संकट असताना देखील आपण धोका पत्करून ह्या विषयाची त्वरित दखल घेतली ह्याबाबत मी चित्रपट सृष्टी तर्फे आपला शत: शत: आभारी आहे, ह्याबरोबर भारतातले दुसरे सर्वात मोठे संकट हे आर्थिक स्वरूपाचे आहे. आज गेली 6 महिने काम बंद असल्यामुळे प्रचंड मंदी आहे, माझ्यासारख्या अनेक मराठी व्यवसायिकांना आर्थिक अडचण जाणवत आहे म्हणूनच आपल्या कडून सहहृदयता व मदतीची ची अपेक्षा आहे.

हिमाचल प्रदेशमधून मुंबईला आलेल्या एका निर्माती व अभिनेत्रीला आपण महापालिकेने केलेल्या बेकायदेशीर बांधकाम विरुद्ध कारवाई संदर्भात बोलावून घेऊन मदत करीत आहात व चित्रपट सृष्टी बरोबर आपण खंबीरपणे उभे आहात ह्याचा मलाच नाही तर संपूर्ण चित्रपटसृष्टीला आभिमान आहे.

मी महाराष्ट्रात राहणारा मराठी चित्रपट निर्माता असून आजपर्यंत १० मराठी चित्रपट निर्मित केले आहेत. मराठी चित्रपट मी फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात घेऊन गेलो आहे व कित्येक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळवले आहेत. माझ्याही चित्रपटांना भारताच्या माननीय राष्ट्रपतींकडून ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.

तरी जशी आपण निर्माती व अभिनेत्री कंगना रानावतला भेटण्याची व आपल म्हणणं मांडायची संधी दिली तशीच मला सुद्धा भेटण्याची वेळ द्यावी व माझ्यावर पुणे महानगरपालिके कडून होत असलेल्या अन्याया बाबत आपल्याशी सखोल चर्चा करण्याची संधी व आपली वेळ लवकरात लवकर मिळावी, ही नम्र विनंती.
आपला

-नीलेश नवलाखा
मोबाईल: 9823391992
ईमेल: nileshnavalakha@yaho

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *