# मातोश्रीवर धमकीचे फोन करणारा आरोपी जेरबंद.

कोलकाता येथून घेतले ताब्यात

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन गेला होता. त्यावर एन्काऊंटर फेम दया नायक यांनी कोलकाताहून पलाश बोस या आरोपीस अटक केली आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अज्ञात नंबरहून धमकीचे फोन आले असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली होती. इतंकच नाही तर खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले. देशमुख यांनी कंगना रणौतवर टिप्पणी केल्यावर हे फोन आले असल्याचं म्हटलं होतं. या फोन प्रकरणाची चौकशी सुरक्षा यंत्रणा करत होती. ज्यांना धमकीचे फोन आले आहेत. त्यांची क्राईम विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी आरोपीचा शोध लावत त्यास कोलकाताहून ताब्यात घेण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *