# उद्यापासून अजंठा एक्स्प्रेस सुरु, पूर्णा-पटना, हैदराबाद -जयपूर विशेष गाडीला मुदतवाढ.

तिन्ही गाड्यांच्या वेळेत बदल; नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस मध्ये तीन अधिक डब्बे जोडले

नांदेड: उद्या मंगळवार, 1 डिसेंबर पासून अजंठा एक्स्प्रेस सुरु करण्यात येणार आहे. तसेच पूर्णा-पटना, हैदराबाद -जयपूर विशेष गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. या तिन्ही गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला असून, नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस मध्ये तीन अधिक डब्बे जोडले आहेत. ही माहिती नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.

1)गाडी संख्या 07064 सिकंदराबाद –मनमाड अजंठा विशेष गाडी 1 डिसेंबर 2020 रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 06.50 वाजता सुटेल, नांदेड येथे रात्री 12.22, औरंगाबाद पहाटे 05.40 मार्गे मनमाड येथे सकाळी 08.05 वाजता पोहोचेल.

2)गाडी संख्या 07063 मनमाड- सिकंदराबाद अजंठा विशेष गाडी 2 डिसेंबर रोजी मनमाड रेल्वे स्थानकावरून रात्री 08. 50 वाजता सुटेल औरंगाबाद – 10.45 , नांदेड पहाटे 03.05, मार्गे सिकंदराबाद येथे सकाळी 08.50 वाजता पोहोचेल.

3)गाडी संख्या 02720 हैदराबाद-जयपूर उत्सव विशेष गाडी 2 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान दर सोमवारी आणि बुधवारी हैदराबाद रेल्वे स्थानकावरून रात्री 08.25 वाजता सुटेल आणि नांदेड 01.20 , हिंगोली, 03.25, अकोला 05.45 मार्गे जयपूर येथे पहाटे 05.25 वाजता पोहोचेल.

4)गाडी संख्या 02719 जयपूर-हैदराबाद उत्सव विशेष गाडी 4 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान दर बुधवारी आणि शुक्रवारी जयपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी 03.20 वाजता सुटेल आणि अकोला-03.20 हिंगोली, 05.00 , नांदेड 07.30 मार्गे हैदराबाद येथे मध्य रात्री 12.45 वाजता पोहोचेल.

5)गाडी संख्या 07610
पूर्णा ते पटना उत्सव विशेष गाडी 4 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान दर शुक्रवारी पूर्णा रेल्वे स्थानकावरून दुपारी 02.10 वाजता सुटेल. नांदेड 02.42, आदिलाबाद-06.20, नागपूर रात्री 12.25 मार्गे पटना येथे रात्री 11.20 वाजता पोहोचेल.

6)गाडी संख्या 07609 पटना ते पूर्णा उत्सव विशेष गाडी 6 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान दर रविवारी पटना रेल्वे स्थानकावरून सकाळी 07.00 वाजता सुटेल. नागपूर 04.40 , आदिलाबाद 11.05, नांदेड 02.22 मार्गे पूर्णा येथे दुपारी 03.25 वाजता पोहोचेल.

7)गाडी संख्या 01141-01142 आदिलाबाद-मुंबई सीएसटी -आदिलाबाद विशेष एक्स्प्रेस मध्ये 1 डिसेंबर पासून 31 डिसेंबर दरम्यान अतिरिक्त 2 द्वितीय श्रेणी (स्लीपर क्लास) आणि 1 वातानुकुलीत द्वितीय श्रेणी (ए.सी. टू टायर ) असे एकूण दिन अतिरिक्त डब्बे वाढविण्यात आले आहेत. या गाडीत एकूण 21 डब्बे असतील. नंदीग्राम विशेष गाडीच्या वेळेत काहीही बदल नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *