# सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद.

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 नोव्हेंबरला शाळा सुरु होणार नाहीत. 31 डिसेंबरपर्यंत 31 मुंबई महापालिका क्षेेत्रातील सर्व शाळा बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आय़ुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे. हे नियम सर्व शासकीय, खासगी, महापालिका शाळांना लागू होणार आहेत.

कोरोनामुळे 23 नोव्हेंबरला 9 ते 12 व्या वर्गापर्यंत शाळा उघडल्या जाणार होत्या. मात्र, कोरोनाची दुसरी लाट येणार, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिक्षकांची कोरोनाची तपासणी सुरु झाली होती, परंतु कोरोनाचा धोका लक्षात घेता शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार –शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड:
महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *