# पत्रकार संघातर्फे सभासद, त्यांच्या कुटुंबियांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध.

पुणे: पुणे आणि परिसरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवसांपूर्वीच आरोग्यसेवा वेळेत न मिळाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांना जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघ, MVR welfare foundation आणि शिवसंग्राम संघटना यांच्या माध्यमातून पत्रकार संघाचे सभासद आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.

ही रुग्णवाहिका पत्रकार संघाच्या आवारात २४ तास उपलब्ध असेल. त्यामुळे पत्रकार सहकाऱ्याला किंवा त्यांच्या कुटुबियांसाठी अगदी कधीही गरज पडल्यास तत्काळ उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.  ही रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध असेल. ज्यांना ऐच्छिक देणगी स्वरूपाचे मूल्य द्यायचे असेल ते देऊ शकतात. ती रक्कम थॅलेसेमिया रोगावर काम करणाऱ्या MVR welfare foundation या संस्थेला देण्यात येईल. अधिक माहितीसाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी मोबाईल ९८८१०९८३६९ व सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे मोबाईल  ९५५२२५४७७७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *