नांदेड: पनवेल, नंदीग्राम सह अमृतसर विशाखापट्टणम एक्स्प्रेस पुन्हा सुरु झाल्या आहेत.
कोरोना च्या दुसऱ्या लाटेत प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यातील बहुतांश रेल्वे गाड्या पुन्हा प्रवाशांच्या सेवेत जुलै महिन्यापासून सुरु होणार आहेत. यात नांदेड- पनवेल एक्स्प्रेस, आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, रामेश्वरम एक्स्प्रेस आणि विशाखापट्टणम एक्सप्रेस जुलै महिन्याच्या पहिल्यात आठवड्यात सुरु होणार आहेत. १ जुलै पासून नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत सुरु झाली आहे. तसेच आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस २ जुलै पासून सुरु होणार आहे. या सोबतच जनशताब्दी एक्स्प्रेस, निजामुद्दीन एक्स्प्रेस, बंगलोर एक्स्प्रेस, जम्मू तावी एक्स्प्रेस, संत्रा गच्ची एक्स्प्रेस, जयपूर एक्स्प्रेस, इत्यादी महत्वाच्या रेल्वे गाड्या या पूर्वीच सुरु झाल्या आहेत. या गाड्या पुढील प्रमाणे सुरु होत आहेत:
1.गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पनवेल विशेष गाडी: ही गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून १ जुलै पासून नियमित सुरु झाली आहे.
2.गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड विशेष गाडी: ही गाडी पनवेल रेल्वे स्थानकावरून २ जुलै पासून नियमित सुरु होत आहे.
3. मुंबई सी.एस.टी.एम. ते आदिलाबाद नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस: गाडी संख्या ०११४१ मुंबई सी.एस.टी.एम. ते आदिलाबाद नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस मुंबई सी.एस.एम.टी. येथून १ जुले २०२१ पासून धावणार आहे.
4.आदिलाबाद ते मुंबई नंदिग्राम विशेष: गाडी संख्या ०११४२ आदिलाबाद ते मुंबई सी.एस.टी.एम. नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस येथून २ जुले पासून धावणार आहे.
5.गाडी संख्या ०४६९२ अमृतसर ते हुजूर साहिब नांदेड (सोमवारी): ही गाडी अमृतसर येथून ५ जुलै रोजी दुपारी १४.३० वाजता सुटेल आणि जालंधर, लुधियाना, न्यू दिल्ली, झांसी, अकोला, वाशीम, हिंगोली मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी रात्री २१.४० वाजता पोहोचेल.
6.गाडी संख्या ०४६९१ हुजूर साहिब नांदेड ते अमृतसर (बुधवारी): ही गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर ७ जुलै पासून दुपारी ११.०५ वाजता सुटेल आणि हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे अमृतसर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी १८.३० वाजता पोहोचेल.
7.गाड़ी संख्या ०१४०४ कोल्हापूर ते नागपूर विशेष एक्स्प्रेस २ जुले पासून कोल्हापूर ते नागपेर अशी धावणार आहे
8.गाड़ी संख्या ०१४०३ नागपूर ते कोल्हापूर विशेष एक्स्प्रेस ३ जुले पासून नागपूर ते कोल्हापूर अशी धावणार आहे.
9.गाडी संख्या ०६७३३ रामेश्वरम ते ओखा विशेष गाडी: ही गाडी रामेश्वरम येथून २ जुलै पासून ५ नोव्हेंबर पर्यंत नियमित सुरु होत आहे.
10.गाडी संख्या ०६७३४ ओखा ते रामेश्वरम विशेष गाडी: ही गाडी ६ जुलै पासून ९ नोव्हेंबर पर्यंत नियमित सुरु होत आहे.
11.गाडी संख्या ०८५६५ विशाखापट्टणम ते नांदेड विशेष गाडी (त्री -साप्ताहिक): ही गाडी विशाखापट्टणम येथून दर मंगळवारी, बुधवारी आणि शनिवारी १० जुलै पासून रात्री २०.०० वाजता सुटून राजमुंद्री, काझीपेत, सिकंदराबाद, निझामाबाद मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १३.३४ वाजता पोहोचणार आहे.
12.गाडी संख्या ०८५६६ नांदेड ते विशाखापट्टणम विशेष गाडी (त्री-साप्ताहिक): ही गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून दर बुधवारी, गुरुवारी आणि रविवारी ११ जुलै पासून दुपारी १६.३५ वाजता सुटेल आणि निझामाबाद, सिकंदराबाद, काझीपेत मार्गे विशाखापट्टणम येथे सकाळी ०९.१५ वाजता पोहोचेल.