अंदमान प्रत्येक देशवासियांचे आस्थेचे ठिकाण संवेदनशिल मनाला हेलावून टाकणारा तेथील सेल्युलर जेल. तिथे प्रत्यक्ष जाऊन विनायक दामोदर सावरकर यांना श्रद्धांजली द्यावी ही मनीषा. आता या अकल्पनीय ठिकाणाला भेट देण्याचा योग ही सहल एक विलक्षण आणि रोमांचकारी अनुभूती देणारी ठरली. हैदराबाद व्हाया बंगळुरू ते पोर्टब्लेअर जवळपास साडेतीन तासाचा प्रवास अगदी उत्स्तुकता वाढवणारा होता. विमानातून दिसणारे ते इटुकले पिटुकले बेट, निळेशार पाणी गर्द हिरवी झाडे सगळे कसे मन मोहून टाकणारे निसर्गरम्य दृश्य, शब्दात सांगणे आणि वर्णन करणे अशक्य. आणि हे सर्व याची देही याची डोळा अनुभवण्याचा योग जुळून आला. स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच तेथील जादुयी वातावरणाचा परिणाम की काय एक स्फुरण जागे झाले. ट्रीप ची सुरुवात बरातांग आदिवासी जंगल फेरीनी झाली. अजूनही तिथे अशी जगावेगळी माणसे आहेत हे पाहून आश्चर्य वाटले. फोटो घेणे कायदेशीर गुन्हा आहे येथील जंगलातून जाताना त्यामुळे फक्त मनाच्या कॅमेरात तेथील चेहरे व दृश्य कैद करून पुढे बोटीने 15 किलोमीटर ची फेरीने प्रवास करून नैसर्गिक निर्मित लेण्या पाहून निसर्गाच्या चित्रकाराला त्याच्या निर्मिती बद्दल मनापासून सलामी दिली आणि नतमस्तक झालो.
अशी ही अद्भुत दुनिया डोळ्यात साठवून परत आपल्या राहत्या ठिकाणी आलो दुसऱ्या दिवशी North bay and Ross जाताना माउंट हॅरिएट वरून विहंगम्म दृश्य पाहण्याचा आनंद पोर्ट्रेट सारखी दृश्य मनाला आल्हादायक करत होती. फोटोसेशन करत प्रवास आणि मनाला तरुण करणारी ती निसर्गाची निर्मिती पाहून इथे येणाचे सार्थक झाल्याचा आनंद आपल्या चलनातील जुन्या 20 रूयाच्या नोटे वर जे दृश्य आहे ते प्रत्यक्ष बघण्याचाआणि त्याच ठिकाणावरुण ते ऐतिहासिक दृश्य टिपण्याचा योग दुर्मिळच. अतिशय सुंदर असे तेथील गार्डन आणि फुलांचे रंग पाहून तर मनाला तरतरी येते आपल्याकडील जास्वंद तर रोज पाहतो पण तिथे तो जोडीने निसर्गाचे आभार मानतो एका त एक असा त्याचा दिमाख समुद्र पाण्याखालील खेळातील स्कुबा डायव्हिंग आणि सी वॉक तर एक दुसऱ्या जगात जावून आल्याचा अनुभव देणारा तो शब्दात व्यक्त करणे कठीण. समुद्र तळातील विविध जीवन आणि जीव सृष्टीचा प्रत्यक्ष स्पर्श डोळ्याचे पारणे फेडणारा एक विलक्षण अनुभव घेत आणि तो प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवत हॅवलॉक ला प्रस्थान दीड तासाच्या सागरी प्रवासातून अंदमानच्या सर्व बेटांना निसर्गाने इतके भरभरून सौंदर्य प्रदान केले आहे ती इथे आलेला भारावून जातो. हिरवीगार एका रांगेत उभी असलेली नारळाची झाडे आपले सहर्ष स्वागत करत असल्याचा आनंद देते. तेथील शहाळ्याचे गोड मधुर पाण्याचा स्वाद इतर सर्व पेय पदार्थाना फिका करणारा खवैयांना ही तृप्ती देणारा अंदमान येतील सीफुड चा आनंद घेतल्या वरच कळेल बीच वरील चटपटीत झालमुरी फ्रूट, चाट पकोडे आणि मॅगी तर लईभारी.
राधा नगर बीच अतिशय निर्मळ आणि सुंदर म्हणून जगविख्यात असलेला पूर्ण दिवस तिथे पाण्यातील लाटा शी खेळण्यात तेथील माऊ मुलायम चमकदार रेती तून चालताना येणाऱ्या सुखद स्पर्शाची अनुभूती घेत गेला अंदमान येथे दिवस खूप लवकर मावळतो पाहता पाहता 5 वाजता अंधार पडतो संध्याकाळी sunset आणि बीच वरील फूड च आनंद घेण्यात गेला. तिथून एका तासा वर असलेल्या नील बेटाला मॅक्रूज ने निघालो Natural bridge एक विलक्षण असे ठिकाण. अद्भुत आणि पाण्यातील जीवसृष्टी प्रत्यक्ष डोळ्याने पाहता येणारे ठिकाण फारच सुंदर व न विसरता येणारे ठिकाण. ओपन fish aquarium जे नैसर्गिक निर्मितीचे पाहून विश्वास न बसणारी ही अद्भुत कलाकृती. त्या बेटावर जाण्यासाठी कुठलेही वाहन उपलब्ध नव्हते. बाईक राईड ठरवून जाता येते पण आम्ही तो 2km चालून च जाण्याचा निश्चय केला जेव्हा तेथील नैसर्गिक जीव सृष्टी पहिली तर चालण्यासाठी झालेल्या त्रासाचा ही विसर पडला. शेवटच्या दिवशी वीर सावरकरांना ज्या ठिकाणी बंदी ठेवले ते सेल्युलर जेल आणि त्याची खोली पाहण्याचे भाग्य लाभले. तेथील वातावरण मन हेलवून टाकणारे त्यांची गाथा ऐकताना शहारे आणणारा क्षण. तिथे असलेल्या सर्व वीर देशभक्तांना साश्रू नयनांनी श्रद्धांजली अर्पण करून भारावलेल्या मनाने आणि भरलेल्या डोळ्याने बाहेर पडलो..
-सौ. कल्पना आंनद देसाई,
औरंगाबाद.