‘मानवलोक’ चे अनिकेत लोहिया केंद्र शासनाच्या जलप्रहरी पुरस्काराने सन्मानीत

अंबाजोगाई: येथील मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांना केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या जलप्रहरी पुरस्काराने आज ३० मार्च रोजी नवी दिल्ली येथील कन्स्टीट्युशन हॉल येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
    
या शानदार कार्यक्रमात मलठाणचे राजदूत रॉबन गावची, जलशक्ती मंत्रालयाचे सतीश गिरीराज सिंह, नदीजोडो चळवळीचे प्रणेते पाणीवाले बाबा राजेंद्र सिंह, सरकार डॉट कॉम चे अमेय साठ्ये, प्रसिद्ध उद्योजक रसिक कुंकुलोळ, खा. गोपाल शेट्टी, खा. उन्मेश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. जल संसाधन, नदी विकास आणि नदी संशोधन विभागाचे एडिटर इन चीफ अमर साठे आणि संयोजक अनील सिंह यांनी अनिकेत लोहिया यांना “जल प्रहरी” हा पुरस्कार जाहीर केला होता.

मराठवाड्यासारख्या पाणी कमी असलेल्या विभागात गेली अनेक वर्षे मानवलोक या संस्थेच्या माध्यमातून पाणी बचतीचे महत्व सर्वसामान्य माणसांना पटवून देत जल संरक्षणासाठी केलेल्या आजपर्यंत च्या कामाची दखल घेवून मानवलोक या संस्थेने पाणी बचतीसाठी केलेले काम, नव्या पिढीला पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी करीत असलेल्या कामांची दखल घेवून केंद शासनाच्या जल शक्ती मंत्रालयाच्या वतीने मागवण्यात आलेल्या प्रस्तावांचा विचार करीत जल प्रहरी या पुरस्कारासाठी मावनलोक या संस्थेची निवड करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *