मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षाच्या खेळादरम्यान आणखी एक मोठी बातमी हाती आलीये. महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती केली.
मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे उद्या निवृत्त होत आहे. त्यांची जागा विवेक फणसाळकर घेणार आहेत. याआधी ते ठाण्याचे पोलीस आयुक्त होते.
कोण आहेत विवेक फणसाळकर?
यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं आहे. विवेक फणसाळकर 1989 च्या बॅचचे अधिकारी आहेत. मुंबई पोलिस दलात काम करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे.
विवेक फणसळकर यांची 31 मार्च 2018 रोजी ठाणे पोलीस आयुक्तलायात पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सुमारे पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभळला. करोना काळात जीवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचण्याऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. कर्तव्य बजावताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना थेट नियुक्ती पत्र देण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबविला होता. त्यांच्या या उपक्रमाचं राज्यभर कौतुक झालं होतं.