औरंगाबाद: औरंगाबाद महापालिका हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इयत्ता ११ आणि १२ वीच्या सर्व माध्यमांचे वर्ग मंगळवार, १५ डिसेंबर पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मार्गदर्शक सूचेनसह यासंदर्भातील एक पत्रक काल जारी केलं. त्यानुसार शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक असणार आहे, केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व नियमांचं पालन करावं, विद्यार्थ्यांच्या उपस्थिती बाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी समंती घ्यावी आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीचा पर्याय निवडला असेल त्या विद्याथर्यांसाठी दुरस्थ शिक्षण पूर्वी प्रमाणे सुरु ठेवण्याचं नमूद करण्यात आलं आहे.