# भारतीय शेतीचा विकास, नवीन तंत्रज्ञान आणि गरजा -गणेश कुंजीर.

भारतीय शेती ही काही प्रमाणात बागायती आणि बऱ्याच प्रमाणात कोरडवाहू अशा प्रकारच्या सिंचन पद्धतीवर अवलंबून आहे. पूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहे आणि शेती ही काळाची गरज आहे हे समजून घेतल्यानंतर भारतातील शेती आणि शेती विषयक तंत्रज्ञान याची गरज समजली. काही दिवसात भारतीय कोरडवाहू शेतीसाठीचे तंत्रज्ञान अवगत करून सावा सीड्स, पुणे यांचेमार्फत सर्व पिकातील नवीन संकरित आणि सुधारित वाण प्रसारित करण्याची गरज कळली आणि हे सर्व वाण भारतातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नांचे फलित म्हणजे सावा सीड्स मार्फत संशोधित आणि प्रसारित केलेले संकरित वाण आणि सुधारित वाण यांची भारतभर वाढलेली मागणी.

सावा सीड्स मार्फत कंपनीचे स्वसंशोधीत प्रसारित केलेले संकरित मक्का अर्जुन आणि शिवा, याशिवाय संकरित बाजरा वाण बिग बॉस , संकरित चारा जवार वाण सुपर फॅट, स्वसंशोधित सुधारित गव्हाचे वाण कनक, भात पिकातील संशोधित वाण जानकी आणि जानवी; आणि त्यासोबतच आई सी ए आर संशोधित चारा पिकाचे वाण आरएल – ८८, बायफ बाजरा नं. १, गोधन, आफ्रिकन टॉल इत्यादी हे वाण विविध ६ राज्यात प्रसारित केले. भारतातील शेतीची गरज आणि कोरडवाहू शेतीसाठी लागणारे वाण याची गरज समजून विविध वाण हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड इत्यादी राज्यात प्रसारित केले. मूलभूत संशोधनासाठी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष श्री. रवींद्र कुंजीर यांच्यासोबत माझे सरकारी मित्र तथा संचालक डॉ. संतोष तावरे आणि श्री. अरुण मुळे याचे मोठे सहकार्य लाभले.

मूलतः महाराष्ट्र राज्य तसेच मध्य भारत येथील शेती ही विविध तृनधान्य, तेलबिया आणि डाळ वर्गीय पिके जे वाण कोरडवाहू शेतीमध्ये चांगले उत्पन्न देऊ शकतात अशाच पिकांसाठी होते. अशाच मूलभूत पिकातील संशोधन आणि प्रात्यक्षिके सुरू ठेऊन विविध वाण हे सावा सीड्स मार्फत प्रसारित करण्यात आले. यापैकी प्रामुख्याने संकरित मक्का अर्जुन आणि संकरित बाजार बिग बॉस हे वाण अतिशय प्रचलित होत आहेत. महाराष्ट्र सोबतच मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आदी राज्यात हे सर्व वाण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत.

कंपनीच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, कंपनीने संशोधित आणि प्रसारित केलेले विविध पिकातील वाण हे प्रायोगिक तत्वावर लावून बघून खात्री करून घ्यावी. आमच्या संशोधन आणि विकास क्षेत्रावर सर्व वाण हे आमच्या शात्रज्ञांच्या देखरेखीखाली चाचणी करून प्रसारित केले आहेत. मी सावा सीड्स कंपनीचे अध्यक्ष श्री. रवींद्र कुंजीर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. संतोष तावरे, विपणन विभागाचे संचालक श्री. अरुण मुळे आणि इतर सर्व सहकारी यांनी केलेल्या साहकाऱ्यामुळे झालेल्या प्रगतीचे श्रेय सर्व सहकार्यास जाते.

सर्व शेतकऱ्यांनी आमच्या कंपनी मार्फत प्रसारित केलेले सर्व वाण हे लावून खात्री करून घ्यावी. कंपनीच्या वतीने सर्व संशोधित वाण हे सर्व प्रकारच्या चाचण्या आणि प्रात्यक्षिके घेऊनच आपल्या परीनं पोहचविण्याची तयारी केली आहे. इतर तांत्रिक माहितीसाठी आपण आमच्या ग्राहक संपर्क क्रमांक  ७०७१८८३६३६ या क्रमांकावर फोन करून सर्व माहिती मिळवू शकता.

-गणेश रवींद्र कुंजीर
लेखक सावा सीड्स प्रा. लि.,
गट क्र. ९४६, कुंजीरवाडी, पुणे या कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत.
मोबाईल: ७०७१८८३६३६
ईमेल: savaseedsllp@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *