ल़ॉकडाऊन मध्ये ऑनलाइन क्लासमुळे जेवढे विद्यार्थ्यांचे हाल झाले तेवढेच किंबहुना जास्त शिक्षकांचे हाल झाले. अनेक कंत्राटी शिक्षकांच्या नोकर्या गेल्या. ज्यामुळे अनेकांवर अक्षरश: मोलमजुरी करण्याची वेळ आली. अगदी पीएच.डी., नेट/सेट सारखं शिक्षण घेतलेल्या लोकांनी सुद्धा रंग-रंगोटी सारखी काम करून वेळ ढकलली आहे. अशा शिक्षकांवर या लेखात औद्योगिक मानसशास्त्राच्या अभ्यासक डॉ. वृषाली राऊत यांनी प्रकाश टाकला आहे…
जगातील सगळ्यात प्रगत व आनंदी देशात एक समान बाब अशी आहे की ह्या सर्व देशातील प्राथमिक शिक्षकांना अत्यंत चांगला पगार असून प्राध्यापक व इतर प्रकारच्या शिक्षकांना सुद्धा चांगला पगार व अत्यंत मानाची वागणूक मिळते. ह्याचं सगळ्यात महत्त्वाच कारण हे आहे की ह्या देशातील मनुष्यबळ हे खर्या अर्थाने विकसित करण्यासाठी चांगले शिक्षक असणे हे वैज्ञानिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे आहे. शिक्षक हे एका प्रकारे पालक असून विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचे काम शिक्षक करतात. फिनलंड, स्वित्झलँड, स्वीडन, नॉर्वे सारख्या देशात शिक्षण ही अत्यंत आनंददायक प्रक्रिया असून ती तशीच राहावी ह्यासाठी शिक्षक आनंदी हवेत व त्याची काळजी हे देश खूप व्यवस्थित घेतात.
हे वाचा
भारतात गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. अगदी गुरु द्रोण पासून सुरू झालेली परंपरा ही रविंद्रनाथ टागोर यांच्या सारख्या ब्रिटिश काळात शिक्षणात शांतिनिकेतन सारखा प्रयोग करणार्या लोकांनी जिवंत ठेवली. ब्रिटीश शिक्षण पद्धती ही फक्त कारकुनी काम करणारे यंत्र-मानव जे त्यावेळच्या ब्रिटिश व्यवस्थेसाठी कामी येतील त्यामुळे अशी पद्धती ही माणूस म्हणून जगण्यासाठी उपयोगाची नाही ह्या भावनेतून टागोरांनी शांतिनिकेतन सुरू केले. टागोरांची ही शिक्षण पद्धती आता वेगळ्या स्वरुपात फिनलंड, स्वित्झलँड, स्वीडन, नॉर्वे सारख्या देशात राबवली जाते. मात्र, आपण अजूनही ब्रिटिश शिक्षण पद्धती वापरतो.
हे बघा
https://www.youtube.com/watch?v=cyN9PF3eQek
शिक्षक हा पेशा हा खरं तर आनंददायी आहे. विद्यार्थी घडवणं ही अत्यंत समाधान देणारी गोष्ट असून शिकवण्याची प्रक्रिया ही भावनिक असते व शिक्षकाने जर ती आनंदाने केली तर शिक्षक सुद्धा घडत जातो. शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतो त्यामुळे आपसूक चांगलं वागण्याची प्रेरणा मिळते पण हा शिक्षक एक व्यक्ती आहे व त्या व्यक्तिला हे चांगलं काम करताना सुद्धा त्रास होतो.
आपण जे काही काम करतो त्याचा आपल्या शरीरावर व मनावर परिणाम होतो. शरीराची व मनाची झीज होते (wear & tear of body as well mind) व ह्याला occupational hazards म्हणजेच कामामुळे जाणवणारे आरोग्याचे धोके असं नाव आहे. International Labor organization ह्या कामगार व कर्मचारी ह्यांच्यासाठी काम करणार्या संघटनेने एखाद्या कामामुळे होणारे आरोग्याचे धोके जाणून घेण्यासाठी एक तक्ता ज्याला Job Safety Analysis म्हणतात सुचविला आहे. मात्र, भारतात काही क्षेत्रं सोडली तर बहुतेक क्षेत्रात हा तक्ता वापरत नाहीत व ह्या तक्त्यांनुसार फक्त शारीरिक धोके हे तपासले जातात. मात्र, मानसिक धोके जे तितकेच किंबहुना जास्त जीवघेणी आहेत ती कुठेही लिहिली किंवा शोधली जात नाहीत.
या तक्त्यात जर मानसिक धोके लिहायला गेलात तर त्यात जाचक नियम, information overload, एकसुरीपण, रटाळ काम व सध्याच्या खासगी शिक्षण क्षेत्रात असलेली नोकरीतील असुरक्षितता सुद्धा येते ज्यातून अशा ठिकाणी काम करणार्या शिक्षकांसाठी काम हे आनंदपेक्षा बोझा ठरतं.
शिक्षण क्षेत्र हे सगळ्यात उदात्त व्यवसाय म्हणून गणला जातो. गेल्या काही वर्षात इतर व्यवसायांप्रमाणे शिक्षक ह्या व्यवसायाचे स्वरूप व्यवसायिकतेकडे झुकले आहे. भारतातील वाढलेल्या औद्योगिकरणाने शिक्षण क्षेत्र हे गेल्या 25 वर्षात व्यावसायिक स्वरुपात रूपांतरित झाले आहे. सरकारी शिक्षक व अध्यापक भरती बंद झाल्यागत जमा आहे. त्यामुळे जे काही शिक्षक सरकारी क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे व त्याचा परिणाम हा शिकवण्याच्या पद्धतीवर होतो. वेतन वाढीसाठी आवश्यक असलेले नियम ज्यात संशोधन करणं हा महत्त्वाचा नियम आहे जो अनेक वेळा शिकविणे, वेगवेगळी काम करणं ज्यात ऑडिट, रेकॉर्ड ठेवणे तसेच अनेक सरकारी कामं येतात ह्यामुळे नीट होत नाही. शिकवण्यासाठी अनेक अनुभव घेणे आवश्यक आहे ज्यात वाचन, प्रवास प्रामुख्याने येतो. परंतु फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणे व परीक्षा घेणे हा उद्देश ठेवल्याने शिकवण्यात एकसूरीपणा आल्याने विद्यार्थी नाराज असतात व त्यांचं मन अभ्यासात लागत नाही.
खासगी शाळा, महाविद्यालय व विद्यापीठ येथील शिक्षकांना सुद्धा वरील नमूद केल्याप्रमाणे अति-काम हया सोबत वेतनाची चिंता हा ताणाचा मुद्दा होतो. अगदी मोजक्या संस्था सोडल्या तर बहुतेक खासगी संस्थांची कामाची पद्धत चुकीची आहे त्यात योग्य व्यवस्थापनाचा अभाव आहे. शिक्षक बहुतेक वेळा 12 तास काम करतात (विशेष करून अभियांत्रिकी, व्यवस्थापन). मी स्वत: सरकारी शाळा व महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आहे त्यामुळे अजूनही शिक्षकांबद्दल आदराची भावना आहे कारण माझे शिक्षण हे अत्यंत कमी खर्चात गुणवत्तेच्या निकषावर झाले. मात्र, खासगी संस्थांमधून प्रचंड फी भरून जेव्हा विद्यार्थी शिक्षण घेतात तेव्हा ते शिक्षकांना सेवा पुरवणारे कर्मचारी असेच बघतात त्यामुळे त्यांना संस्थेशी व शिक्षकांशी बांधिलकी अजिबात नसते त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी नातं हे अत्यंत भावनाशून्य असतं व दोन्ही बाजूंनी बांधिलकी नसते. त्यामुळे जेव्हा असे विद्यार्थी कामांच्या ठिकाणी रूजू होतात तेव्हा कितीही टिम बिल्डींगचं प्रशिक्षण दिले तरी त्यांच्यात सांघिक भावना आणणं कठीण जातं. सतत बदलणारे सरकारी नियम हयातून सरकारची शिक्षकी पेशाबद्दल अनास्था दिसते. मी स्वत: PhD करताना हा अनुभव घेतला आहे.
ल़ॉकडाऊन मध्ये ऑनलाइन क्लासमुळे जेवढे विद्यार्थ्यांचे हाल झाले तेवढेच किंबहुना जास्त शिक्षकांचे हाल झाले. अनेक कंत्राटी शिक्षकांच्या नोकर्या गेल्या. ज्यामुळे अनेकांवर अक्षरश: मोलमजुरी करण्याची वेळ आली. अगदी पीएच.डी., नेट/सेट सारखं शिक्षण घेतलेल्या लोकांनी सुद्धा रंग-रंगोटी सारखी काम करून वेळ ढकलली आहे.
हे वाचा
ऑनलाइन क्लास हे कमालीचं कंटाळवाणे व अवघड काम आहे कारण आपण शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन समजावून सांगताना कमालीचा ताण अनुभवतात. मी स्वत: पदवी व पदव्युतर विद्यार्थ्यांना ऑगस्ट 2020 पासून ऑनलाइन शिकवत आहे. मी विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवायला वेगवेगळे विषयाशी संबंधित व्हीडियो दाखविणे, सतत प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचं लक्ष आहे की नाही हे बघणे, दर अर्ध्या तासाने 5 मिनिटाची विश्रांती देणे, चालू जगातील घडामोडींवर चर्चा घडवून आणणे असले प्रकार करते त्यामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष काही प्रमाणात का होईना लागतं. मात्र, हे करताना माझी प्रचंड ऊर्जा खर्च होते हेच प्रकार सर्व शाळा व विद्यापीठातील शिक्षकांसोबत ऑनलाइन क्लासमुळे होतात. शिकवण्याच्या जोडीला परीक्षा, प्रशासन संबंधित जबाबदार्यांमुळे बाकीच्या गोष्टी करायला लागल्याने वाचन, लिखाण व संशोधन ह्या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. बहुतेक शिक्षकांना ऑनलाइन शिकवण्यासाठी लागणारी तंत्र आत्मसात करावी लागली. अनेक 40 च्या पुढे गेलेल्या लोकांना शारीरिक व मानसिक शक्ती कमी पडल्याने अनेक वेळा नवीन तंत्राशी जुळवून घेणे कठीण जाते. त्याचा परिणाम त्यांच्या शिकवण्यावर होत आहे. एरवी छान शिकवणारे शिक्षक ऑनलाइन शिकवण्यात कमी पडतात. पालक व विद्यार्थी भरमसाट फी भरून शाळा व विद्यापीठाकडून पैसे वसूल व्हावे ह्यासाठी पण ऑनलाइन शिक्षणाचा अट्टाहास करतात ज्यामुळे कोरोना काळात शिक्षण क्षेत्राचं खूप नुकसान झालं आहे. अनेक पालक हे मूल ऑनलाइन क्लासमध्ये नीट बसत नाही, क्लासच्या ऐवजी ऑनलाइन गेम खेळतात, नको त्या गोष्टी ऑनलाइन बघतात अशी तक्रार करतात. अशा आभासी देवाणघेवाणीत कुठलीही भावनिक प्रक्रिया घडत नाही जी शिक्षकांसाठी ओढ निर्माण करू शकते. विद्यार्थ्यांना रागवणं सुद्धा कठीण असत कारण लगेच विद्यार्थी/पालक तक्रार करतात. सुदैवाने माझे विद्यापीठ हे अत्यंत समजूतदार व सांभाळून घेणार असल्याने मला विशेष त्रास झाला नाही.
ज्या खेड्यात इंटरनेट ची सुविधा नाही तिथे जमेल व असेल त्या साधनांचा वापर करून शिक्षकांनी मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून शिकवलं आहे. काही शिक्षकांनी तर स्वत: च्या जवळचे पैसे खर्च करून अगदी घरी जाऊनही मुलांना शिकवलं आहे.
हे वाचा
शहरी व निमशहरी विद्यार्थ्यांमध्ये आलेला बदल हा पण विस्मयकारक आहे. इंटरनेट, सोशल मीडिया अशा गोष्टीं च्या वापराने बहुतेक विद्यार्थी हे मानसिक आरोग्याच्या समस्या ने ग्रस्त असतात व त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही, वाचन कमी असते, शारीरिक हालचाली नसल्याने अनेक व्याधी लहान वयात मागे लागतात. अशी चिडचीडी मूल-मुली कितपत शिक्षकांच्या मेहनतीला समजू शकतील ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. कमालीचं उतावळेपण, एकाग्र चित न होणे, मेहनतीची इछ नसणे ह्या सगळ्या गोष्टी कमी कष्टात झटपट यश मिळविणे हयाकडे विद्यार्थ्यांचा कल दिसतो व पालक पण ह्याला जबाबदार असतात.
हे वाचा
https://www.universityworldnews.com/post.php?story=20140129114437933
ह्या सगळ्या गोंधळात शिक्षकाचं नुकसान आहे. शिक्षक लाचार होण हे समाजाला परवडण्यासारखं नाही. ऑनलाइन शिक्षण हा प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षणाला पर्याय असू शकत नाही त्यामुळे सरकारने, स्वत: शिक्षकांनी व पालकांनी ह्या गोष्टीवर आवर्जून विचार करा.
“In learning you will teach, and in teaching you will learn.”
― Phil Collins
–प्रा.डॉ.वृषाली रामदास राऊत
सहा. प्रा. औद्योगिक मानसशास्त्र,
विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे
मोबाइल: 9921369165