# वाहन चालकांना भेडसावणारे शारीरिक व मानसिक धोके – प्रा.डॉ. वृषाली राऊत.

ऑस्ट्रेलियात ट्रक चालकांना 12 तास ट्रक चालवायची मुभा आहे ज्यात दर 5 तासांनी त्यांना अर्ध्या तासाची सक्तीची विश्रांती घ्यावी लागते. कॅनडात 13 तास ट्रक चालवायची परवानगी आहे ज्यात दर दोन तासांनी 15 मिनिटांची सक्तीची विश्रांती व काम झाल्यानंतर 8 तास विश्रांती जरूरी आहे. भारतात मात्र ट्रक, बस, टॅक्सी यासारख्या वाहन चालकांना अत्यंत त्रासदायक काम जीवावर उदार होऊन करावं लागतं. यूनायटेड नेशन २०१८ च्या अहवालानुसार ५८ बिलियन डॉलर्स च नुकसान भारतीय रस्त्यावरील अपघातांमुळे होतं. अशीच गत ही काही प्रमाणात बस व टॅक्सी चालकांची असून ह्या सर्व चालकांना विविध शारीरिक व मानसिक धोक्यांना रोज सामोरे जावे लागते. ट्रक चालकांना थकवा, अनिद्रा, लठ्ठपणा, पाठदुखी, सांध्याची दुखणी, कमजोर दृष्टी, श्वासाचे विकार, ताण व एकटेपणा हे आजार जास्त प्रमाणात आढळून येतात.

दिनांक २५ जानेवारी २०१२ च्या सकाळी पुणे एका घटनेने हादरले ज्यात संतोष माने ह्या बस चालकाने पाळी बदलून दिली नाही म्हणून बस निष्काळजीपणाने चालवून ९ लोकांचा जीव घेतला व २७ लोकांना गंभीर जखमी केलं. बस चालकांना येणार्‍या ताणाच हे अत्यंत दुर्दैवी प्रकटीकरण होत. ह्या घटनेमुळे चालकांना येणार्‍या ताणावर खूप चर्चा झाली. मात्र, पुढे त्यावर योग्य व ठोस अशी उपाय योजना काहीच झाली नाही.

ऑस्ट्रेलिया सारख्या देशात ट्रक चालकांना 12 तास ट्रक चालवायची मुभा आहे ज्यात दर 5 तासांनी त्यांना अर्ध्या तासाची सक्तीची विश्रांती घ्यावी लागते. कॅनडा मध्ये 13 तास ट्रक चालवायची परवानगी आहे ज्यात दर दोन तासांनी 15 मिनिटांची सक्तीची विश्रांती व काम झाल्यानंतर 8 तास विश्रांती जरूरी आहे. भारतात मात्र व्यावसायिक वाहन चालक ज्यात ट्रक, बस, टॅक्सी ह्यासारखे लोक येतात त्यांना अत्यंत त्रासदायक काम जीवावर उदार होऊन करावं लागतं. यूनायटेड नेशन २०१८ च्या अहवालानुसार ५८ बिलियन डॉलर्स च नुकसान भारतीय रस्त्यावरील अपघातांमुळे होतं. अशीच गत ही काही प्रमाणात बस व टॅक्सी चालकांची असून ह्या सर्व चालकांना विविध शारीरिक व मानसिक धोक्यांना रोज सामोरे जावे लागते. ट्रक चालकांना थकवा, अनिद्रा, लठ्ठपणा, पाठदुखी, सांध्याची दुखणी, कमजोर दृष्टी, श्वासाचे विकार, ताण व एकटेपणा हे आजार जास्त प्रमाणात आढळून येतात.
हे वाचा
https://scroll.in/article/952708/whats-causing-frequent-truck-accidents-on-indian-roads-overworked-drivers-with-no-healthcare

आपण जे काही काम करतो त्याचा आपल्या शरीरावर व मनावर परिणाम होतो. शरीराची व मनाची झीज होते (wear & tear of body as well mind) व ह्याला occupational hazards म्हणजेच कामामुळे जाणवणारे आरोग्याचे धोके असं नाव आहे. International Labor organization ह्या कामगार व कर्मचारी ह्यांच्यासाठी काम करणार्‍या संघटनेने एखाद्या कामामुळे होणारे आरोग्याचे धोके जाणून घेण्यासाठी एक तक्ता ज्याला Job Safety Analysis म्हणतात सुचविला आहे. मात्र, भारतात काही क्षेत्रं सोडली तर बहुतेक क्षेत्रात हा तक्ता वापरत नाहीत व ह्या तक्त्यांनुसार फक्त शारीरिक धोके हे तपासले जातात. मात्र, मानसिक धोके जे तितकेच किंबहुना जास्त जीवघेणी आहेत ती कुठेही लिहिली किंवा शोधली जात नाहीत.

या तक्त्यात जर मानसिक धोके लिहायला गेलात तर त्यात कमालीचा ताण, आक्रमक स्वभाव, हिंसा, चिंता, व तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी केलेली, ताण घालविण्यासाठी व मग व्यसनात रूपांतर झालेल्या सवयी सुद्धा येतात.

कुठलेही वाहन चालवताना ताण हा येतोच कारण वाहन चालवताना आपण भीती अनुभवतो. मी स्वत: दुचाकी व चार चाकी वाहने बरीच वर्षे चालविली आहेत. हिंजवडी च्या रस्त्यावर वाहन चालवताना मला दर दोन दिवसांनी एक अपघात बघायला मिळाला की काळजात धस्स व्हायचं. मानवी मेंदूतील भावनिक केंद्र ज्याला amygdala म्हणतात ते आपल्या मानवी उत्क्रांतीची देणगी आहे, amygdala हे भीतीवर काम करते व cortex हा मेंदूतील भाग तर्कशुद्ध विचार करतो. Amygdala ला भीती जाणवली (मानसिक किंवा शारीरिक) तर तो शरीर ला संदेश देतो की आता स्वत: च रक्षण करायला हवं, मग त्यानुसार मानवी शरीर एक तर त्या भीती वाटणाऱ्यापासून दूर जात किंवा भीती वाटणाऱ्या शी दोन हात करायला सज्ज होतं, ह्याला flight/fight अस नाव आहे. शरीर ह्या भय अवस्थेत ताण अनुभवत असत.
वाहन चालवताना मेंदूला अत्यंत सतर्क राहावं लागतं ज्यात आपली सर्व मानसिक व शारीरिक शक्ती वाहन नियंत्रण करण्यात जाते त्यामुळे जी लोक झोपेच्या/ नशेच्या पदार्थाच्या अमलाखाली वाहन चालवितात त्यांना जास्त धोके होतात कारण अगदी 3 सेकंदाची डोळ्यावरच्या झांपडेने सुद्धा संपूर्ण जगाशी आपला संपर्क तुटतो.
भारतीय चालकांना अति प्रमाणात वाहन चालवल्याने अजिबात नीट झोप होत नाही त्यामुळे शरीराला व मेंदूला विश्रांती मिळत नाही तसेच जेवणाच्या वेळा न पाळने, सतत बैठक ह्यामुळे पचन शक्ती खालवते ज्यामुळे इतर शारीरिक आजारांना नियंत्रण मिळतं. चालकांना अत्यंत कमी पगार व कुठल्याही आरोग्याच्या सुविधांशिवाय काम कराव लागत त्यातून येणारी असुरक्षितता सुद्धा ताणाला आमंत्रण देतं.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या कर्मचार्‍यांचे पगार अत्यंत तुटपुंजे असून कोविड च्या काळात अनेक कर्मचार्‍यांवर मोलमजुरी करायची वेळ आली. अशीच गत थोड्याफार फरकाने ऑटो रिक्षा चालकांची आहे. बस व ऑटोरिक्षा चालकांना सतत प्रदूषण व आवाजाच्या सानिध्यात राहिल्याने श्वसनाचे आजार, ऐकण्याची क्षमता कमी होणे अशा गोष्टी सहन कराव्या लागतात ज्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम तर होतोच पण पुढे जाऊन आयुष्य पण कमी होतं. सुट्टी, विमा व इतर सुविधा न मिळाल्याने चालकांचे आयुष्य हे अत्यंत धकाधकीचे असते.
चालकाचं मानसिक संतुलन नीट राहील तर वाहनात बसलेल्या लोकांच्या जीवाला धोका कमी असतो त्यामुळे किमान चालकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणारी यंत्रणा उभी करण अत्यंत जरुरीच आहे. थकलेल्या शरीराने काम होत नाही त्यामुळे मेंदूला व शरीराला तरतरी येण्यासाठी व्यसनं केली जातात ज्यातून मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होतोच परंतु मेंदूतील भावनिक नियंत्रण कमी होऊन उतावळेपण वाढीस लागते ज्यामुळे योग्य/ अयोग्य ची रेषा धूसर होऊन मेंदू मोहाच्या क्षणाला बळी पडून गुन्हे घडतात. स्वप्न-झोप ही दारू/ अमली पदार्थांमुळे पूर्ण/ नीट होत नाही ज्याने मनुष्य चेहर्‍यावरील हाव भाव वाचण्याची क्षमता गमवितो जे आपल्या सामाजिक आयुष्यासाठी खूप आवश्यक आहे ज्यामुळे संशय बळावून भांडण वाढीस लागतात. हे एक कारण न समजल्याने चालकांवर गुन्हेगारीचा शिक्का नकळत बसतो जो आयुष्य उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरतो.
बरेच दिवस घरापासून दूर राहिल्याने शरीराच्या लैंगिक गरजा पूर्ण होण्यासाठी काही तात्पुरत्या गोष्टी केल्याने पण नको त्या रोगांना ट्रक, टॅक्सी व बस चालकांना सामना करावा लागतो. चालक हा व्यवसाय अत्यंत धोका दायक अश्या व्यवसाय प्रकारात मोडतो ज्यात काम करणार्‍या लोकांना अत्यंत तुटपुंज्या मानधनात काम कराव लागतं.

ट्रक, बस व टॅक्सी चालकांना वरील नमूद केलेल्या धोक्यांशिवाय रात्रीच्या वेळेस रस्त्यात लुटणे, सामान हिसकावून घेणे व कधी तर वाहन चोरीला जाण्याचा धोका असतो. पोलीसांकडून सुद्धा चालकांना चुकीची वागणूक मिळते त्यामुळे गुन्हेगार व पोलीस ह्या दोन्हीकडून चालकांना घाबरून वागावं लागतं. टाटा मोटर्स, कॅस्ट्रॉल, अपोलो ह्यासारख्या कंपन्या ट्रक चालकांसाठी अनेक योजना राबवित आहेत ज्यात ट्रक चालकांचे मानसिक व शारीरिक आरोग्य कसे राखता येईल ह्याची काळजी घेतली जाते.

टाटा मोटर्स ची योजना इथे वाचा
https://loconav.com/news/tata-motor-samarth-welfare-program/#:~:text=Swasthya%20Samarth%20aims%20to%20provide,be%20issued%20by%20Tata%20AIG.

कॅस्ट्रॉल ची योजना इथे वाचा
https://corporate.apollotyres.com/responsibility/healthcare-for-trucking-community/

अपोलो ची योजना इथे वाचा
https://corporate.apollotyres.com/responsibility/healthcare-for-trucking-community/
ह्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकार राज्य परिवहन मंडळ, ऑटो रिक्षा व टॅक्सी कामगारांच्या संघटना ह्या प्रकारे चालकांच्या कल्याणासाठी योजना राबवू शकतात. अपघात व इतर रस्त्यावरील दुर्घटनेत जे वेगवेगळ्या प्रकारचं प्रचंड नुकसान होतं ते थांबवायचं असेल तर चालकांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची व सरकारची जबाबदारी आहे.
“If you are drowsy while driving, please, please stop. It is lethal. To carry the burden of another’s death on your shoulders is a terrible thing.”
― Matthew Walker, Why We Sleep: Unlocking the Power of Sleep and Dreams
-प्रा.डॉ.वृषाली रामदास राऊत
सहा. प्रा. औद्योगिक मानसशास्त्र,
विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे
vrushali31@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *