# औरंगाबादेत दर दिवशी कोरोनाबाधित रुग्णांची भर; आज 17 जणांची वाढ, जिल्ह्यात एकूण 373 कोरोनाबाधित.

 

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 34 आणि ग्रामीण भागातील एक कोरोनाबाधित वाढल्याने काल बुधवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 356 झाली होती. आज त्यामध्ये 17 रूग्णांची वाढ होऊन जिल्ह्यात एकूण 373 कोरोनाबाधित रूग्ण झाले आहेत.

औरंगाबाद शहरातील विविध भागात
दररोज कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क असली तरी दर दिवशी वाढत चाललेल्या संख्येमुळे चिंता वाढली आहे. आज गुरूवारी सकाळी 17 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोनाबाधित 373 झाले आहेत.

कोरोनाबाधित आज वाढ झालेल्या 17 जणांमध्ये (कंसात रुग्ण संख्या) रेल्वे स्टेशन परिसर(01), जयभीम नगर (02), किलेअर्क (2), पुंडलिक नगर (5), हमालवाडी (4), कटकट गेट (3) या परिसरातील आहेत. यामध्ये 10 पुरूष आणि सात महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *