अभियंता सुरेखा भालशंकर यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट प्रदान
औरंगाबाद: सहायक अभियंता सुरेखा शिवाजी भालशंकर यांना 22 ऑगस्ट 2020 रोजी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्या सध्या महावितरण जालना येथे सहायक अभियंता या पदावर कार्यरत आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांनीही इंजिनिअरिंगमध्ये वाखाणण्याजोगे यश प्राप्त केले आहे. सुरेखा यांचे वडील शिवाजी भालशंकर हे देखिल महावितरण कंपनीमध्ये कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत.
सुरेखा भालशंकर यांनी दहावी व बारावी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केल्यामुळे त्यांना महावितरणची स्कॉलरशिप मिळाली. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये (बीई) किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना स्कॉलरशिप. मास्टर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये (एमई) महाविद्यालयातून टॉपर. याबरोबरच यूजीसीचे नॅशनल फेलोशिप अवार्ड. पीएच. डी. अंतर्गत संशोधन करताना रिसर्च स्कॉलर म्हणून यूजीसीचे नॅशनल लेवल संशोधन फेलोशिप अवार्ड प्राप्त. सुरेखा भालशंकर यांनी आतापर्यंत नाविन्यपूर्ण 10 शोधनिबंध डॉ. सी. एम. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केले आहेत. त्यांनी स्मार्ट ग्रीड तंत्रज्ञान वापरून स्मार्ट होम अपारंपरिक उर्जास्त्रोत एकिकरणाने नॅनो वीज निर्मितीच्या साह्याने स्वयं उर्जा निर्मिती तंत्र, या विषयावर शोधनिबंध सादर केला.