मुंबई: अभिनेत्री कंगना रणौतच्या मुंबईतील ऑफिसवर मुंबई महापालिकेकडून तोडकाम कारवाईची सुरुवात झाली आहे. कंगना आता मुंबई पालिकेच्या रडारवर आहे. कंगनाच्या मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या कार्यालयामधील तळमजल्यावर पालिकेच्या तोडकामास सुरुवात झाली आहे. पालिकेची टीम कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर दाखल झाली आहे.
या ठिकाणी असलेल्या कार्यालयामध्ये बेकायदेशीर बदल झाल्याचा आरोप पालिकेकडून करण्यात आला होता. बेकायदेशीर बदलांसाठी पालिकेने मंगळवारी नोटीस देखील बजावली होती. नोटिशीला 24 तास उलटल्यानंतर पालिकेकडून तोडकाम कारवाई होत आहे. म्हणजेच याठिकाणी जे कोणते अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावर पालिकेचा हातोडा पडत आहे. दरम्यान,’मुंबई आता खरच POK झाली आहे’ असं आणखी एक वादग्रस्त ट्वीट कंगनाने केलं असल्यामुळे या वादात आणखी भर पडली आहे.