# मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांचे औरंगाबादेत निधन.

 

औरंगाबाद: माजी आमदार व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती
बॅ. बी.एन. देशमुख काटीकर (८५वर्षे) यांचे आज शुक्रवारी पहाटे औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी १० वाजता औरंगाबाद येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा सून दोन नातवंडे असा परिवार आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी राज्यसभा सदस्य अॅड. नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, माजी खासदार उध्दवराव पाटील यांचे ते भाच्चे होत.  ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते.  मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील असलेले व औरंगाबादेत स्थायिक झालेले बी. एन. देशमुख उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असताना राज्य विधान परिषदेवर त्यांची निवड झाली होती. नंतर त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. शेतकरी, कष्टकरी कामगार तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय ‘ऐतिहासिक’ ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *