मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले. दोन लाख रुपये दंड ठोठावला असून सहा महिन्यात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती.