# सीबीएसीई बोर्ड दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.

खालील लिंक वर क्लिक करून पहा वेळापत्रक

नवी दिल्ली: सीबीएसीई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक बोर्डाने जाहीर केलं आहे. दहावीची परीक्षा 4 मेपासून सुरू होणार असल्याचं सीबीएसई ने आधीच जाहीर केलं आहे. आता या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर झालं आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) वेबसाईट cbse.gov.in आणि cbseacademic.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर हे वेळापत्रक अपडेट करण्यात येईल.

या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा लांबणीवर पडली होती. दरवर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या या परीक्षा यंदा मे मध्ये घेण्यात येतील. 4 मे ते 10 जून या दरम्यान परीक्षा होणार आहेत.

या दोन्ही बोर्डाच्या परीक्षांचं टाइमटेबल मंगळवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली होती.

31 डिसेंबर रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करत, 4 मे ते 10 जून या दरम्यान परीक्षा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु सीबीएसई दहावी परीक्षेच्या वेळेसंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती. आज वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.

कसं डाउनलोड कराल दहावी सीबीएसई वेळापत्रक – cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा

– नवीन वेबसाईटवर क्लिक करा

– CBSE Class 10 date sheet 2021 वर क्लिक करा, त्यानंतर सीबीएसई च्या वेळापत्रकाची PDF डाउनलोड करा

31 डिसेंबर रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करत, 4 मे ते 10 जून या दरम्यान परीक्षा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु दहावी परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती. आज वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर करण्यात आलं.

शिक्षण मंडळाने गणित, सामाजिक विज्ञान, विज्ञानसह सर्व विषयांसाठी सीबीएसईच्या 10वीच्या नमुन्यांचे पेपर अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहेत. सीबीएसईच्या 10वीच्या नमुन्यांमध्ये मागील वर्षी विचारले गेलेले सर्व प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नची कल्पना येण्यासाठी हे जाहीर केलं आहे.

येत्या 2021 च्या बोर्ड परीक्षेसाठी मंडळाने दहावीचा अभ्यासक्रम 30 टक्के कमी केला आहे. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ग उशीरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण होणं शक्य नाही. तसंच ऑनलाईन वर्ग सुरू असल्याने अवघड संकल्पना समजण्यास अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांच्या पुढच्या शिक्षणात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी अभ्यासक्रम वगळताना काळजी घेण्यात आली आहे.

सीबीएसई दहावीचे विद्यार्थी कमी झालेला अभ्यासक्रम तपासू शकतात आणि त्यानुसार परीक्षेची तयारी करू शकतात, जेणेकरून अतिरिक्त अभ्यास करण्यात वेळ वाया जाणार नाही. इयत्ता दहावीचा वगळण्यात आलेला अभ्यासक्रम याआधीच बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *