# विदर्भासह मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता.

पुणे:  दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी, मध्यमहाराष्ट्रात व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज पुणे येथील वेदशाळेने व्यक्त केला आहे. दरम्यान, पुणे शहर व परिसरात मेघगर्जना व विजाच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या चोवीस तासात कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्यमहाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या चोवीस तासात नोंदविला गेलेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढील प्रमाणे:  कानकोन 150, दाभोलीम (गोवा), मालवण 130 प्रत्येकी, कॅपे वेंगुर्ला 110 प्रत्येकी, मार्मागोवा 100, मंडणगड 90, देवगड, सांगे 70 प्रत्येकी, मीरा कणकवली सावंतवाडी 60 प्रत्येकी, खेड कुडाळ लांजा, महाड, होंडा, राजापूर 50 प्रत्येकी. चिपळूण, दोडामार्ग मापसा, रत्नागिरी, संगमेश्वर, देवरुख, वैभववाडी 40 प्रत्येकी. कर्जत, पनवेल, पेडणे, पोलादपूर, सुधागड, पाली 30 प्रत्येकी. बेलापूर, ठाणे, भिवंडी, दापोली, कल्याण, खालापूर, माणगाव, मसाळा, मुरूड, श्रीवर्धन, पुरण, बीज प्रत्येकी 20, डहाणू, गुहागर, जव्हार, कुलाबा, मुंबई, शहापूर, विक्रमगड, वाडा प्रत्येकी 10 मिलिमीटर.

मध्यमहाराष्ट्र:  दहिगाव 80, गगनबावडा 70, राधानगरी 50, धरणगाव, एरंडोल, महाबळेश्वर, पन्हाळा, शाहूवाडी 30 प्रत्येकी. अमळनेर, नेर, चांदगड, जळगाव, लोणावळा, श्रीरामपूर 20 प्रत्येकी, आजरा, इगतपुरी, कोपरगाव, नंदुरबार, पाचोरा, पारोळा, राहुरी, शिराळा प्रत्येकी 10 मिलिमीटर.
मराठवाडा:  पूर्णा, सोनपेठ 50 प्रत्येकी, कन्नड 40, भोकरदन, वैजापूर 30 प्रत्येकी, बीड, माजलगाव, वाशी 20 प्रत्येकी, निलंगा, सेलू, उमरी, वसमत 10 प्रत्येकी.
घाटमाथा:  कोयना (पोफळी), ताम्हीणी 70 प्रत्येकी. डोंगरवाडी 60, आंबवणे, कोयना (नवजा) 50 प्रत्येकी, शिरगाव, दावडी 40 प्रत्येकी. खोपोली, लोणावळा (टाटा) 20 प्रत्येकी, लोणावळा (ऑफिस) वानगाव, भिवपुरी, खंद 10 मिलिमीटर प्रत्येकी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *