पुणे: ऐन थंडीचा असलेल्या डिसेंबर महिन्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. आणखी दोन दिवस म्हणजेच 15 डिसेंबर पर्यंत मध्यमहाराष्ट्र, विदर्भ या भागातील काही शहरांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडकाटात पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्राच्या दक्षिण आणि मध्य भागात गेल्या तीन दिवसांपासून तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कायम आहे. या क्षेत्राचा प्रभाव आणखी दोन दिवस राहणार आहे. त्यानंतर या क्षेत्राची तीव्रता कमी होईल.
जळगावसह विदर्भातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट: दरम्यान, हवामान विभागाने जळगाव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.