संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांचा इशारा
पुणे: मुठभर शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी कोकणातील जाहीर कार्यक्रमात शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा अपमान केलेला आहे. म्हणून त्यांनी महाराष्ट्राची 24 तासात माफी मागितली पाहिजे.. अन्यथा भाजपचं दुकान महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बंद केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिला आहे.
भाजपची मानसिकताच घाणेरडी आहे.
जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी प्रत्येक संकट अंगावर झेलून शेतीमध्ये राबराब राबतो. मुठभर धान्य पेरून हजारो सोन्यासारखे दाणे (धान्य) तो जमिनीतून उगवतो. त्या शेतकऱ्याचा अपमान चंद्रकांत पाटला सारख्यां नतदृष्ट लोकांनी करणे हे दुर्दैवी आहे. चंद्रकांत पाटलांनी शेतकऱ्यांच्या अपमान केल्याप्रकरणी (वाचाळविरांनी) महाराष्ट्राची तत्काळ माफी मागितली पाहिजे.
चंद्रकांत पाटलांची मानसिकता संघी आहे. साडेतीन टक्के लोकांच्या जीवावर जगणारे चंद्रकांत पाटील आणि भाजप निवडणुकीच्या काळात 97% (कुणबी) शेतकऱ्यांच्या घरासमोर जाऊन मतांची भीक मागतात, त्यावेळेस त्यांना लाज वाटत नाही का.? दिल्लीतील केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतील हिटलरशाही गदागदा हलवली म्हणून भाजपला ‘मूठभर’ शेतकरी वाटतात. परंतु त्याच मूठभर शेतकऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे. ‘शेतकरी विरोधी काळे कायदे तत्काळ रद्द करा…’ हीच संपूर्ण देशाची मागणी आहे. चंद्रकांत पाटलांनी शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकरी (कुणबी) बांधवांचा अपमान केला आहे. म्हणून त्यांनी महाराष्ट्राची 24 तासात माफी मागितली पाहिजे.. अन्यथा भाजपचं दुकान महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बंद केल्याशिवाय राहणार नाही, असेही संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.