कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
पुणे: सोमवारी परभणी, नाशिक व पुणे शहरात निच्चांकी तापमानाची नोंद झाली असून, कोकण व मध्य महाराष्ट्रात ९ रोजी बुधवारी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे..
दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने देशातील २३ राज्यांत ८ ते ११ डिसेंबर दरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर भारतात नवा पश्चिमी चक्रावात ११ डिसेंबरपासून येत असल्याने हिमवर्षाव वाढणार आहे. या सर्वच वातावरणाचा महाराष्ट्रावर परिणाम होत असून राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, प. बंगाल, सिक्कीम, चंदीगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, सौराष्ट्र, तर दक्षिण भारतात आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक, केरळ, लक्षव्दिप या भागातही मोठा पाऊस सुरू आहे. या सर्व परिस्थितीमुळे उत्तर भारतात दाट धुके दिसत आहे. तसेच दृश्यमानता कमी होत आहे.
राज्यातील प्रमुख शहरांचे सोमवारचे किमान तापमान पुढीलप्रमाणे: (अंश सेल्सिअसमध्ये)
परभणी १०.७ , नाशिक १०.५, पुणे १०.७, जळगाव १२.६, कोल्हापूर १६.९, महाबळेश्वर १३.९, मालेगाव १३.२, बुलढाणा १४.२, ब्रम्हपुरी १३.२, चंद्रपूर १७.८, गोंदिया १२.५, नागपूर १३.२, वाशिम १३, वर्धा १३.४, मुंबई १७.८, रत्नागिरी २०.६, डहाणू १८.७.