# राज्यात थंडी वाढणार; उत्तर भारतात थंडीची लाट 22 जानेवारीपर्यंत.

पुणे: उत्तर भारतातील बहुतांश राज्यात थंडीची तीव्र लाट आली आहे.  मात्र, राज्यात मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. असे असले तरी 20 जानेवारीनंतर राज्यात विशेषत: विदर्भात थंडी वाढेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीने पूर्णपणे पाठ फिरविली आहे. त्यात ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे काही भागात किरकोळ पावसाने हजेरी लावली होती.  परिणामी किमान तापमानात सरासरीपेक्षा अगदी साता ते आठ अंशांनी वाढ झाली आहे. आता मात्र किमान तापमानाचा पारा कमी होणार आहे. उत्तर भारतातील दिल्लीसह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, राजस्थान, या भागात थंडीची लाट आली असून, दाट धुके तयार झाले आहे. याबरोबरच 22 जानेवारीपर्यंत हिमालयीन भागात पश्चिमी चक्रावात तयार होणार आहे. त्यामुळे थंडीच्या लाटेमध्ये वाढ होणार आहे. परिणामी उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे वाहणार आहेत. त्यामुळे राज्यात विदर्भासह सर्वच भागात थंडी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *