# पुणे विभागातून इतर राज्यात व जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्यांनी घाबरु नये, रितसर परवानगी मिळेल -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर.

 

पुणे: पुणे विभागातून इतर राज्यांत किंवा इतर जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या लोकांनी, विद्यार्थ्यांनी, मजूरांनी घाबरुन जावू नये, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे विभागात अडकलेल्यांना ज्या भागात जावयाचे आहे त्यांना त्यांच्या भागाची स्वीकृती देणे अपेक्षीत आहे. जी व्यक्ती किंवा ग्रुप जावू इच्छितो त्यांनी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावेत. तसेच खाजगी किंवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र चालू शकतील. त्यामुळे शासकीय रुग्णालयांच्या समोर अनावश्यक गर्दी टाळावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. हे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपण अर्ज पाठवावा.

अर्ज पाठविल्यानंतर तो अर्ज संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे जाईल. जेथे जावू इच्छिता त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज पाठविण्यात येईल. त्यांची संमत्ती मिळाल्यावरच जाण्यास परवानगी दिली जाईल. अशी परवानगी देतांना त्यांनी स्वत: जाण्याची व्यवस्था करणे अपेक्षीत आहे. काही ठिकाणी राज्य शासन व केंद्र शासन जसा निर्णय घेईल त्याप्रमाणे रेल्वेची व्यवस्था केली जावून शकते. परंतु त्याबाबतीत केसनिहाय निर्णय होईल. म्हणून माझी सर्वांना पुन्हा कळकळीची विंनती आहे की विनाकारण, अनावश्यक गर्दी टाळावी. आजपर्यंत आपण सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाऊनमुळे जे काही प्राप्त केलय त्याचे विनाकारण नुकसान होईल असे कुठलीही कृती करु नये, असेही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले आहे.

2 thoughts on “# पुणे विभागातून इतर राज्यात व जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्यांनी घाबरु नये, रितसर परवानगी मिळेल -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर.

  1. मुलगा पुण्याला शिकतो त्यास भुसावळला आनावयाचे आहे

  2. Amhi punyat akdloy gavi jaiche ahe pagar nahi paise nahit ky karave lagel gavakadun koni yeu saktat ka tyasathi ky karave lagel… plz plz amhala gavi jaudya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *