ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे आदेश
नागपूर: महावितरणमधील उपकेंद्र सहायक (2000 जागा) आणि विद्युत सहायकाच्या (5000 जागा) अशा एकूण 7000 भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी मंंगळवार, 4 ऑगस्ट रोजी आयोजित बैठकीत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले. यापूर्वी २३ जूनला ऊर्जामंत्री यांनी यासंदर्भात भरती करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोविड आणि लॉकडाऊनमुळे त्यास विलंब झाला.
आता ही भरती दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात उप केंद्र सहायकांचे दस्तऐवज तपासणी करून भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर विद्युत सहायक निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 7000 जागांची भरती असल्याने सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड नियमांच्या अधीन राहून ही पदभरती करण्यात यावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.