बीड: जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ६ गावांसह ५ शहरातील एकूण ३० ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित करुन अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३) नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे.
केज तालुक्यातील कानडी माळी व बांगर वस्ती, बीड तालुक्यातील नागापूर खुर्द, माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हाण आणि शिरूर कासार तालुक्यातील शिरापूर धुमाळ व टेंभुर्णी.
बीड शहरातील राजुरी वेस, शाहूनगर, पिंगळे गल्ली, जमजम कॉलनी, बशीर गंज, काळा हनुमानठाणा, मारुती मंदिर जवळ लोनापुरा, संत नामदेव नगर व चर्हाटा फाटा.
अंबाजोगाई शहरातील गांधी नगर, माळीनगर, प्रशांत नगर, गुरुवार पेठ मध्ये २ ठिकाणी, पाटील चौक व क्रांतीनगर.
केज शहरातील वकील वाडीमध्ये दोन ठिकाण व फुलेनगर.
परळी शहरातील इस्लामपुरा बंगला , किर्तीनगर, तळ विभाग नेहरू चौक व रामनगर. धारूर शहरातील क्रांती चौक या ६ गावात व शहरांमधील वरील संबंधित २४ परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे असे आदेशात नमूद केले आहे.
जिल्ह्यातील १९ ठिकाणी कंटेन्मेंट झोन शिथील:
बीड जिल्ह्यात काही ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याने १९ संबंधित भागातील प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत.
या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी कळविले आहे.
बीड शहरातील शिवाजी नगर, स्वराज्य नगर, अक्सा कॉलनी, शहंशाह नगर, विद्यानगर, अजीजपुरा काली मस्जिद, कालिका नगर, आदित्य नगरी, कॅनरा बँक कॉलनी, माळी गल्ली, वीरशैव कॉलनी, सावता माळी चौक येथे २ ठिकाणी व आनंदनगर धानोरा रोड या भागात.
अंबाजोगाई शहरातील फॉलोअर्स कॉर्टर परिसरात, हाऊसिंग सोसायटी भाग 1 व बागवान गल्ली.
धारूर शहरातील काशिनाथ चौक
आणि गेवराई तालुक्यातील मौजे सुलतानपूर हे गाव व वरील भागातील संबंधित परिसरात असलेले कन्टेन्मेंट झोन शिथील करण्यात आले आहे. या ठिकाणी परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.