बीड: जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे बीड शहरात ६, अंबाजोगाई शहर ३, गेवराई शहरातील ३ तसेच बीड, परळी व माजलगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३)नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक आहे .
बीड शहरातील शनी मंदिर, टिळक रोड (बलभीम चौक), धनराज कॉलनी (पालवन चौक), रिपोर्टर रोड (जुन्या एसपी ऑफिस जवळ), गजानन नगर नाळवंडी नाका, विप्र नगर, अंबाजोगाई शहरातील हनुमान मळा जोगाईवाडी, अनुराग कॉलनी परळी रोड व हौसिंग सोसायटी भाग -2, गेवराई शहरामध्ये मोमीनपुरा, माऊली नगर, बेंद्रे गल्ली या शहरातील ठिकाणी तसेच, बीड तालुक्यातील नेकनूर हमीदनगर (एस. एस. कॉम्प्लेक्स), परळी तालुक्यातील टोकवाडी आणि माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण व नवीन वसाहत भाटवडगाव येथे या गावात व वरील संबंधित परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे असे आदेशात नमूद केले आहे.