पुणे: विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला थंडीचा कडाका मंगळवारी सुध्दा कायम राहिला. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद चंद्रपूरची झाली असून, तेथे 8.2 किमान तापामान नोंदले गेले आहे. सरासरी पेक्षा हे तापमान 9.2 अंश सेल्सिअसने कमी आहे. दरम्यान, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागातही थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागला आहे.
राज्यात गेल्या आठवड्यापासून थंडी सुरू झाली. मात्र, त्यावेळी कडाका थोडा कमी होता. कोरडे हवामान झाल्यानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडीत वाढ होऊ लागली तर किमान तापमानात देखील घट होऊ लागली आहे. दरम्यान, 13 नोव्हेबर रोजी पश्चिमी चक्रावात हिमालयीन भागात धडकणार आहे. त्यानंतर उत्तर भारताकडून राज्याकडे थंड हवा वाहण्यास सुरूवात होणार आहे. त्यानंतर थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.
राज्यात मंगळवारी सायकांळी सात वाजेपर्यंत नोंदलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे: पुणे- 11.3, लोहगाव- 12.7, जळगाव- 12, कोल्हापूर- 16, महाबळेश्वर- 13.6, मालेगाव- 13.2, नाशिक- 11.8, सांगली- 14.5, सोलापूर- 13, मुंबई- 22.5, रत्नागिरी- 21, डहाणू – 19.8, उस्मानाबाद- 14, औरंगाबाद- 12.5, परभणी- 10.1, नांदेड-15.4, अकोला- 12.7, अमरावती- 12.5, बुलढाणा- 13.8, ब्रम्हपुरी- 13.2, चंद्रपूर- 8.2, गोंदिया-10.5, वर्धा- 12.4.