पुणे: पुणे विभागातील 1 हजार 503 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 742 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 43 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 128 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 3 हजार 258 बाधित रुग्ण असून 1 हजार 358 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 730 आहे. कोरोनाबाधित एकूण 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 117 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्ह्यातील 123 कोरोनाबाधित रुग्ण असून 35 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 86 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 299 कोरोनाबाधित रुग्ण असून 72 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 208 आहे. कोरोनाबाधित एकूण 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील 41 कोरोनाबाधित रुग्ण असून 29 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 21 कोरोनाबाधित रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 37 हजार 381 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 35 हजार 142 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 239 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 31 हजार 367 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 3 हजार 742 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 99 लाख 13 हजार 60 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 28 लाख 80 हजार 229 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 452 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.