# औरंगाबाद जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू; एकूण 11 हजार 440 कोरोनाबाधित.

औरंगाबाद:  जिल्ह्यातील 20 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. सकाळी पहिल्या टप्प्यात 179 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहेत. त्यामुळे आतापर्यंत 11440 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 6300 बरे झाले, 405 जणांचा मृत्यू झाला. तर 4735 जणांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये घाटीत न्याय नगरातील 51 वर्षीय स्त्री, पडेगावातील 83 वर्षीय पुरूष, हर्सूलच्या चेतना नगरातील 70 वर्षीय स्त्री, कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील 65 वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयात श्रेय नगरातील 48 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोरोनाबाधित रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसात रुग्ण संख्या) मनपा हद्दीतील(15)- न्यू हनुमंत नगर (1), शिवाजी नगर, गारखेडा (1), बालाजी नगर (1), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (1), सह्याद्री नगर (1), सॅबेस्तियन कॉलनी (1), खडकेश्वर (1), म्हाडा कॉलनी, एन दोन सिडको (1), अजब नगर (1), एन सहा सिडको (1), एन दोन सिडको (1), अन्य (4).

ग्रामीण भागातील रूग्ण:(5)- नेवरगाव, गंगापूर (1), राजापूर (1), देवगाव रंगारी (1), गंगापूर (1), वडगाव कोल्हाटी (1).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *