औरंगाबाद: जिल्ह्यातील 130 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 16243 एवढी झाली आहे. त्यापैकी 11960 बरे झाले तर 526 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3757 जणांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये खासगी रुग्णालयांमध्ये नंदनवन कॉलनतील 54 वर्षीय स्त्री आणि खुलताबाद तालुक्यातील माळीवाडा येथील 49, गंगापूर तालुक्यातील अंबेगावातील 85, गंगापुरातील 82 वर्षीय पुरूष कोरोनबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या): मनपा (70)- एन सहा सिडको (1), मुकुंदवाडी (4), एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), बीड बायपास, आलोक नगर (1), उस्मानपुरा (1), सादात नगर (1), भिमाशंकर कॉलनी (4), खडकेश्वर (1), कासलीवाल मार्बल इमारत परिसर (1), शिवाजी नगर, गारखेडा (2), मिटमिटा (7), मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी (1), श्रेय नगर (1), हिंदुस्तान निवास, नक्षत्रवाडी (1), जवाहर कॉलनी (1), हनुमान चौक, चिकलठाणा (1), सुपारी हनुमान रोड, नगारखाना (1), लघुवेतन कॉलनी, सिडको (1), आशा नगर, शिवाजी नगर (1), जय भवानी नगर (2), एन अकरा टीव्ही सेंटर (1), हर्सूल टी पॉइंट (3), गणेश नगर (1), पद्मपुरा (1), बालाजी नगर (10), पानदरीबा (1), हर्सूल (1), एन दोन, राजीव गांधी नगर (1), चिकलठाणा (1), गुरूसहानी नगर, एन चार (1), पन्नालाल नगर, उस्मानपुरा (1), अन्य (1), मथुरा नगर, सिडको (1), नक्षत्रवाडी (1), प्राईड इग्मा फेज एक (1), बन्सीलाल नगर (2), पैठण रोड (1), हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर (1), एकनाथ नगर (1), गुरूदत्त नगर (1), बंजारा कॉलनी (1), मोंढा परिसर (1), महालक्ष्मी चौक परिसर (1), एन चार, सिडको (1)
ग्रामीण भागातील रूग्ण:(60)- चिंचखेड (1), लासूर स्टेशन (2), राम नगर, पैठण (1), जर गल्ली, पैठण (1), सिडको, वाळूज (1), बजाज नगर (3), वडगाव, बजाज नगर (1), ओमकार सो., बजाज नगर (2), बीएसएनएल गोडावूनजवळ, बजाज नगर (1), वाळूज पोलीस स्टेशन परिसर (2), भोलीतांडा, खुलताबाद (5), पाचोड, पैठण (2), लगड वसती, गंगापूर (1), कायगाव, गंगापूर (9), जाधवगल्ली, गंगापूर (1), शिवाजी नगर, गंगापूर (2), झोलेगाव, गंगापूर (1), समता नगर, गंगापूर (1), गंगापूर (5), सिल्लोड (3), टिळक नगर, सिल्लोड (3), शिवाजी नगर, सिल्लोड (3), समता नगर, सिल्लोड (1), बालाजी नगर, सिल्लोड (2), वरद हॉस्पिटल परिसर,सिल्लोड (1), शास्त्री कॉलनी, सिल्लोड (2), उपआरोग्य केंद्र परिसर, सिल्लोड (1), पानवडोद, सिल्लोड (1), आंबेडकर नगर, सिल्लोड (1).