औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज 273 जणांना (मनपा 70, ग्रामीण 203) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 16713 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 367 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21759 झाली आहे. आजपर्यंत एकूण 659 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4387 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 244 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटिजन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 74, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 75 आणि ग्रामीण भागात 69 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे:(कंसात रुग्ण संख्या)
ग्रामीण भागातील रूग्ण:(85) -हडस, पिंपळगाव (11), नवगाव (1), सावळा मार्केट, सिल्लोड (1), मुळे गल्ली वैजापूर (2), औरंगाबाद (12), गंगापूर (8), कन्नड (25), सिल्लोड (12), वैजापूर (1), सोयगाव (11) महालपिंप्री (1)
मनपा:(10)- एनआरएच हॉस्टेल (1), एन नऊ, एम दोन सिडको (1), जोगेश्वरी, आंबेडकर नगर (2), स्वातंत्र्यसैनिक कॉलनी (1), ज्ञानेश्वर नगर (2), देवळाई परिसर (1), न्यू बायजीपुरा (2)
सिटी एंट्री पॉइंट:(74)- मयूरबन कॉलनी (3), व्हिजन सिटी, कांचनवाडी (1), बजरंग चौक (1), सुराणा नगर (3), विशाल नगर, गारखेडा (1), चिकलठाणा (1), सिडको(1), पद्मपुरा (3), रांजणगाव (3), गोल्डन सिटी (2), बजाज नगर (9), तारांगण पडेगाव (2), नंदनवन कॉलनी (1), एम दोन, ज्ञानेश्वर नगर (2), नागेश्वरवाडी (1), कांचनवाडी (7), प्रताप नगर (1), बिडकीन (1), नक्षत्रवाडी (2), वाळूज (4), पडेगाव (2), पिसादेवी रोड (2), मलकापूर (1), एन अकरा सुदर्शन नगर (1), भावसिंगपुरा (3), नवनाथ नगर (2), राजूर दाभाडी (1), राम नगर (7), बीड बायपास (1), एन दोन सिडको (1), शेंद्रा (3), पोलिस कॉलनी, चिकलठाणा (1)
14 कोरोनाबाधितांचा मृत्यू: घाटीत पिसादेवी, हर्सूल येथील 60 वर्षीय स्त्री, एन अकरा सिडकोतील 70 वर्षीय स्त्री, एकता नगरातील 63 वर्षीय स्त्री, भारत नगरातील 35 वर्षीय पुरूष, बिडकीन पैठण येथील 54 वर्षीय पुरूष आणि विविध खासगी रुग्णालयांत मयूर पार्कमधील 72 वर्षीय पुरूष, घाटशेंद्रा, कन्नड येथील 55 वर्षीय पुरूष, नागद येथील 65 वर्षीय स्त्री, गणेश कॉलनीतील 58 वर्षीय पुरूष, दत्त नगर संभाजी कॉलनीतील 63 वर्षीय पुरूष, क्रांती नगरातील 80 वर्षीय पुरूष, गादिया विहार रोड, शहानूरवाडी परिसरातील 83 वर्षीय पुरूष, एन दोन सिडकोतील 60 वर्षीय स्त्री, बन्सीलाल नगरातील 71 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.