औरंगाबाद: जिल्ह्यातील 66 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 13104 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 8536 बरे झाले, 443 जणांचा मृत्यू झाला. तर 4125 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये अँटिजेनद्वारे केलेल्या तपासणीतील ग्रामीण भागातील 40 रुग्णांचा समावेश आहे.
रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या): ग्रामीण भागातील रुग्ण(43)- संतपूर, कन्नड (1), पाचोड (1), बजाज नगर (1), औरंगाबाद (3), गंगापूर (9), सिल्लोड (6), वैजापूर (21), पैठण (1).
मनपा हद्दीतील रुग्ण(23): गारखेडा (1), चिकलठाणा (1), उल्कानगरी (1), पडेगाव (2), राम नगर (1), एसटी कॉलनी (2) पंचशील नगर (2), नारेगाव (2), किर्ती सो., एन आठ (1), ज्ञानेश्वर कॉलनी, गारखेडा (1), मुकुंदवाडी (6), जय भवानी नगर (2), एन दोन सिडको(1).