कोरोनाबाधितांमध्ये अमेरिका, ब्राझीलनंतर भारत तिसऱ्या स्थानावर कायम
नवी दिल्ली: कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे जगभरातील एकूण 215 देशांना कोरोनाने वेढले असून बाधितांची एकूण संख्या 15 कोटी 10 लाख 1 हजार 115 एवढी झाली आहे. तर मृतांची संख्या ही 6 लाख 20 हजार 043 एवढी झाली आहे. दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांची संख्या ही 11 लाख 94 हजार 888 एवढी झाली असून, मृतांची संख्या ही 28 हजार 771 एवढी झाली आहे.
जगातील कोरोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर अमेरिका असून अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या ही 4 कोटी 28 हजार 733 एवढी असून तेथे आजपर्यंत एकूण 1 लाख 44 हजार 958 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या स्थानावर ब्राझील असून तेथे 2 कोटी 16 लाख 6 हजार 532 कोरोनाबाधित असून एकूण 81 हजार 597 जणांचा मृत्यू झाला आहे. भारत तिसऱ्या स्थानावर असून भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 12 लाखांच्या जवळपास असली तरी दिलासादायक बाब म्हणजे अमेरिका व ब्राझील या देशांच्या तुलनेत मृतांची संख्या कमी आहे.