नवी दिल्ली: भारतात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ही 7 लाख 21 हजार 310 एवढी झाली आहे. या संख्येने जगात अमेरिका, ब्राझीलनंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. आजच्या तारखेत देशात 20 हजार 184 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. अनलॉक केल्यापासून ही संख्या झपाट्याने वाढत चालल्याने पुन्हा मुंबई, औरंगाबादसह अन्य शहरांची वाटचाल लॉकडाऊनकडे सुरू आहे. जगात अमेरिकेत आजपर्यंत 1लाख 32हजार 981 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सध्या तेथे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ही 30लाख 41हजार 35 एवढी असून अमेरिका कोरोना बळी व पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येने जगात पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील असून तेथे एकूण पॉझिटिव्ह रूग्ण संख्या 16लाख 26हजार 71 एवढी असून मृतांचा आकडा 65हजार 556 एवढा आहे.
जगातील कोरोना पॉझिटिव्ह व बळींची संख्या दर्शवणारा तक्ता
Country or Region | Cases | Deaths | Recovered |
USA | 3041035 | 132981 | 1325066 |
Brazil | 1626071 | 65556 | 1072229 |
India | 721310 | 20184 | 440229 |
Russia | 694230 | 10494 | 463880 |
Peru | 305703 | 10772 | 197619 |
Spain | 298869 | 28388 | 0 |
Chile | 298557 | 6384 | 264371 |
UK | 285768 | 44236 | 0 |
Mexico | 261750 | 31119 | 159657 |
Iran | 243051 | 11731 | 204083 |