# राज्यात आज ११ हजार ४१६ नवीन रुग्णांची नोंद; ३०८ जणांचा मृत्यू.

एकाच दिवसात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई: राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.७६ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७५ लाख ६९ हजार ४४७ नमुन्यांपैकी १५ लाख १७ हजार ४३४ नमुने पॉझिटिव्ह (२०.५ टक्के) आले आहेत. राज्यात २२ लाख ६८ हजार ५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २४ हजार ९९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले ११,४१६ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३०८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू):
मुंबई मनपा-२२०३ (४८), ठाणे- २०८ (२), ठाणे मनपा-३७५ (६), नवी मुंबई मनपा-३०९ (६), कल्याण डोंबिवली मनपा-३१५ (२), उल्हासनगर मनपा-३१, भिवंडी निजामपूर मनपा-३२ (१२), मीरा भाईंदर मनपा-१६६ (१), पालघर-६८, वसई-विरार मनपा-१७१ (४), रायगड-१६२ (१), पनवेल मनपा-१६३ (६), नाशिक-२२७ (८), नाशिक मनपा-४९८ (८), मालेगाव मनपा-१६, अहमदनगर-५१५ (१८), अहमदनगर मनपा-२९८ (६), धुळे-४१, धुळे मनपा-२३ (१), जळगाव-१२२ (५), जळगाव मनपा-६० (१), नंदूरबार-३१, पुणे- ६३४ (२२), पुणे मनपा-७२४ (१६), पिंपरी चिंचवड मनपा-४१४ (८), सोलापूर-१९२ (२२), सोलापूर मनपा-५१, सातारा-४५२ (२६), कोल्हापूर-११३ (१), कोल्हापूर मनपा-३४, सांगली-२५२ (७), सांगली मिरज कुपवाड मनपा-४८ (३), सिंधुदूर्ग-४४ (२), रत्नागिरी-५६ (४), औरंगाबाद-९७ (२),औरंगाबाद मनपा-१७५ (२), जालना-८७ (१), हिंगोली-२०, परभणी-३४, परभणी मनपा-२९, लातूर-५४ (२), लातूर मनपा-४७ (३), उस्मानाबाद-८९ (७), बीड-१२५ (८), नांदेड-८१, नांदेड मनपा-८८ (२), अकोला-१३, अकोला मनपा-२४, अमरावती-५५ (४), अमरावती मनपा-४९ (२), यवतमाळ-६० (२), बुलढाणा-६१, वाशिम-३० (४), नागपूर-२४८ (५), नागपूर मनपा-३४७ (१३), वर्धा-७९ (१), भंडारा-९४ (४), गोंदिया-६४ (३), चंद्रपूर-१०९ (३), चंद्रपूर मनपा-४८ (४), गडचिरोली-१४२, इतर राज्य-१९.

राज्यातील एकूण बाधीत रुग्ण:-(१५,१७,४३४)
बरे झालेले रुग्ण:- (१२,५५,७७९)
मृत्यू:- (४०,०४०)
इतर कारणांमुळे झालेले मृत्यू:- (४५९)
ॲक्टीव्ह रुग्ण:- (२,२१,१५६).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *