मुंबई: राज्यात आज कोरोनाच्या ४६३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख २३ हजार १९२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ५५.०६ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ९१ हजार ६५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख ९१ हजार ५४९ नमुन्यांपैकी २ लाख २३ ७२४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३८ हजार ७६२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२२ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले १९८ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-२८, नवी मुंबई मनपा-८, पालघर-३, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक मनपा-५, अहमदनगर-१, जळगाव-८, जळगाव मनपा-२, पुणे-४, पुणे मनपा-२७, पिंपरी-चिंचवड मनपा-५, सोलापूर मनपा-८, सातारा-८, कोल्हापूर-३, सांगली-मिरज-कुपवाड मनपा-२, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-५, जालना-३, बीड-१, नांदेड-२, अकोला मनपा-२, यवतमाळ-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.