# राज्यात आज ६७४१ नवीन रुग्णांचे निदान; २१३ कोरोनाबाधितांचा मृत्यू.

 

मुंबई: राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ४९  हजार ००७  झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख  ७ हजार ६६५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २१३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २१३ मृत्यू हे मुंबई मनपा-७०, ठाणे-१५, ठाणे मनपा-१५, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-७, उल्हासनगर मनपा-७, भिवंडी-निजामपूर मनपा-१२, वसई-विरार मनपा-८, रायगड-२, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-५, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, धुळे मनपा-२, जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-६, पुणे मनपा-१०, पिंपरी-चिंचवड मनपा-९, सोलापूर-३, सोलापूर मनपा-३, सातारा-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-१, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-४, परभणी-१, परभणी मनपा-१, लातूर-२, नांदेड-३, अकोला-१, बुलढाणा-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *